Narendra Jadhav: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र रद्द होणार? नरेंद्र जाधवांनी दिले संकेत; नेमका घोळ काय झाला? हे ही सांगितलं

Narendra Jadhav: दोन दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं हे स्पष्ट केलं आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भाषांची सक्ती केलेली नाही.
Dr Narendra Jadhav
Dr Narendra JadhavSarkarnama
Published on
Updated on

Narendra Jadhav: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र रद्द होणार असल्याचे संकेत यासंदर्भातील अंमलबाजवणीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्यात त्रिभाषा सुत्राबाबतचा नेमका घोळ काय झाला? हे देखील त्यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या समितीची भूमिका स्पष्ट केली.

Dr Narendra Jadhav
Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर सोमवारी होणार फैसला? अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

दोन दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं हे स्पष्ट केलं आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भाषांची सक्ती केलेली नाही. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकणंही बंधनकारक नाही. यापार्श्वभूमीवर बोलताना नरेंद्र जाधव म्हणाले, "पहिली गोष्ट म्हणजे पहिलीपासून तीन भाषांची सक्ती असणार नाही. शैक्षणिक धोरणात हेच होतं की, कालांतरानं हळूहळू तीन भाषा शिकवण्यात येतील. आता दुसरी गोष्ट जी केंद्र सरकारनं स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे हिंदी भाषा ही सक्तीची भाषा राहणार नाही, शैक्षणिक धोरणातही हे स्पष्ट होतं.

Dr Narendra Jadhav
Shankar Mandekar: "मी किर्तनात असतो, माझा भाऊ कला केंद्रावर गेला हे शॉकींग"; गोळीबार प्रकरणावर आमदार मांडेकरांनी पहिली प्रतिक्रिया

हिंदी भाषा सक्तीची असणार नाही हे स्पष्ट असतानाही माशेलकर समितीनं तो गोंधळ केला आणि हिंदी पहिलीपासून बंधनकारक केली. आता आमची समिती याचा साकल्यानं अभ्यास करणार आणि बदललेल्या तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आणि केंद्र सरकारनं स्पष्ट केलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर भाषा सूत्र कसं असावं? हे ठरवण्याचं काम करणार आहे. ही भूमिका लक्षात घेऊन दोन्हींच्या संदर्भामध्ये भाषा सुत्राचं पुनर्लेखन कसं करता येईल, याचा विचार ही समिती करणार आहे.

Dr Narendra Jadhav
Rohit Pawar: कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ कसा मिळाला? रोहित पवारांचा मोठा खुलासा

आयुष्यात उभं राहण्यासाठी जास्तीत जास्त मदत होईल अशा प्रकारचं भाषा सूत्र शालेय शिक्षणामध्ये आणणं हे आमच्या समितीचं ध्येय आहे आणि मी ते अत्यंत निपक्षःपातीपणे आणि अत्यंत प्रामाणिकपणे कुठल्याही दडपणाला बळी न पडता मांडणार आहे, असंही नरेंद्र जाधव यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com