Santosh Deshmukh Murder : "हात हलवत परत आलास, आमची इज्जत घालवलीस" : विष्णू चाटेने केलेल्या अपमानाने घुले पेटला

Santosh Deshmukh : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर रोज नवे खुलासे होत आहेत. या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडला हत्येचा मास्टरमाईंड ठरविण्यात आले आहे.
Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Walmik Karad Santosh Deshmukh MurderSarkarnama
Published on
Updated on

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर रोज नवे खुलासे होत आहेत. या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडला हत्येचा मास्टरमाईंड ठरविण्यात आले आहे. यामागे अनेक पुरावे आणि जबाब याचा आधार पोलिसांनी घेतला आहे. यात तिरंगा हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या गोपनीय साक्षीदाराचा जबाब अत्यंत महत्वपूर्ण ठरला. कारण याच बैठकीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्याचा कट रचला गेल्याचे सांगण्यात येते.

काय घडले होते तिरंगा हॉटेलमध्ये?

6 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग येथील भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) दिसत होता. त्यानंतर 8 डिसेंबर 2024 रोजी घुले आणि अन्य एक जण टाकळी गावात भेटले. यावेळी घुले याने विष्णू चाटे याचा फोन आला होता, त्याने आपल्याला तिरंगा हॉटेलमध्ये जेवायला बोलावले आहे, असे त्या व्यक्तीला सांगतिले. चाटे तिथे आधीच येऊन बसला होता. जेवताना चाटेने घुलेला चांगलेच झापले.

Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Santosh Deshmukh : फोन ठेवताच पप्पा खूप घाबरलेले...; हत्येच्या आदल्या दिवशी आलेला 'तो' फोन कुणाचा? संतोष देशमुख नेमकं काय बोलले? वैभवीने जबाबात सांगितलं

"तुला प्लॉट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलास. आम्ही कमवायचे आणि तुम्ही वाटोळे करायचे. स्वत:ची पण आणि आमची पण इज्जत घालवलीस," असे चाटे (Vishnu Chate) म्हणाला. त्यावर "आम्ही कंपनी बंदच करायला गेलो होतो. पण तिथं तो देशमुख मध्ये आला. त्याने कंपनी बंद करून दिली नाही. काय करायचं, असा सवाल घुलेने विचारला.

यावर चाटेने वाल्मिक कराडचा निरोप दिला. "वाल्मिक अण्णांचा निरोप आहे की, कामही बंद केले नाही. पैसे पण दिले नाहीत. आता संतोष देशमुख आडवा येत असेल आला तर त्याला कायमचं आडवं करा. याच निरोपानंतर घुले पेटून उठला. त्याने सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार, प्रतिक घुले आणि जयराम चाटे यांना सोबत घेतलं. दुसऱ्याच दिवशी सहा जणांनी संतोष देशमुख यांना गाठलं, त्यांचं अपहरण केलं आणि निर्घृण हत्याही केली.

Walmik Karad Santosh Deshmukh Murder
Harsvardhan Sapkal In Sadbhavana Rally : संतोष देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या नावासमोर 'शहीद' असा उल्लेख हवा!

याच चर्चेवेळी तिथे उपस्थित असलेल्या तिसऱ्या गोपनीय व्यक्तीने पोलिसांना जबाब दिला आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याचा विष्णू चाटेला निरोप, विष्णूचे सुदर्शन घुलेले आदेश आणि त्यानंतर देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्या कड्या पोलिसांनी जुळवल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com