Sujat Ambedkar News : रडत आला तर ठोकून काढू, सुजात आंबेडकर काँग्रेसला नडले!

India Alliance : वीस-पंचवीस आमदार घरी बसले तर तुमचं रडगाणं ऐकूण घेणार नाही
Sujat ambedkar, Rahul Gandhi
Sujat ambedkar, Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Sujat ambedkar on India alliance : इंडिआ आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार की नाही, हे अजून स्पष्ट झाले नाही. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीनंतर यावर निर्णय झाला नाही. मात्र, आता सुजात आंबेडकर यांनी थेट इंडिया आघाडीला, काँग्रेसला इशाराच दिला. "अशोक चव्हाण परत पराभूत झाले. सुशीलकुमार शिंदे पराभूत झाले. पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले. दहा बारा खासदार घरी बसले. वीस-पंचवीस आमदार घरी बसले तर मग रडत येऊ नका. तुमचं रडगाणं ऐकूण घेणार नाही. ठोकून काढू", असे सज्जड दमच सुजात यांनी दिला.

Sujat ambedkar, Rahul Gandhi
Deepak Kesarkar : "शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होणार होते पण राऊतांनी...": केसरकरांचा गौप्यस्फोट

सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांची निर्धार सभा झाली. भारत जोडो यात्रा काढणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सुजात यांनी टिकास्त्र सोडले. ते भारत जोडायला निघाले आहेत. पण भारत जोडण्यासाठी आधी जाती तोडाव्या लागतील. त्यासाठी बाबासाहेबांना जवळ घ्यावे लागते. आम्ही एक टर्म घरी बसू पण तुमचे काय? असा थेट सवालही सुजात यांनी विचारला.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी पत्र लिहून राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना प्रस्ताव पाडला. मात्र, त्यावर अजून निर्णय झाला नाही. आम्ही या वेळी सत्तेत आलो नाही तर बाहेर बसण्याची आमची तयारी आहे. त्या पुढे आलो नाही तर दरवाजे तोडून सत्तेत जाऊ. पण तुमचं काय? तुमच्या संस्था, सहकारी संस्था, तुमचे नातेवाई टिकवून ठेवण्यासाठी पक्ष बदलत आहेत, असे सांगून काँग्रेस नेत्यांवर टिका केली.

सुजात आंबेडकरांनी राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान वरून देखील खिल्ली उडवली. राजस्थान, छत्तीसगड, राजस्थानमध्ये मोहब्बत की दुकान उघडणार होते. मात्र, तेथे असलेले काँग्रेसचे दुकान बंद पडले. तेलगंणामध्ये जिंकल्यावर काय केले तर दुटप्पी भुमिका घेतली. एबीव्हीपीची, संघाची पार्श्वभुमी असलेला रेवंथ रेड्डीला मुख्यमंत्री केले. ही दुटप्पी भुमिका थांबली पाहिजे, असा टोल देखील सुजात यांनी लगावला.

(Edited By Roshan More)

Sujat ambedkar, Rahul Gandhi
Wrestler Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनियाने 'पद्मश्री' केला परत ? भारतीय कुस्ती महासंघात राजकारण..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com