Sujay Vikhe Patil : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील, उपाध्यक्षपदी देशमुख

Ahilyanagar DCC Bank Chairman : थोरात गटाकडे सर्वाधिक 11 जागा होत्या. तर, विखे पाटील गटाकडे सात जागा होत्या.मात्र, निवडणूक एकत्र लढल्याने अध्यक्ष कोण होणार याची चर्चा होती.
Sujay Vikhe Patil DDC Bank Chairman
Sujay Vikhe Patil DDC Bank ChairmanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे पाटील, तर उपाध्यक्षपदी रणजीत देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खासदार निलेश लंके यांनी रणजीत देशमुख यांची भेट घेतल्याने ही निवडणूक होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, आज विखे पाटील यांची अध्यक्षपदी तर, देशमुख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.

मंत्री विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. थोरात गटाकडे सर्वाधिक 11 जागा होत्या. तर, विखे पाटील गटाकडे सात जागा होत्या. मात्र, ही निवडणूक दोन्ही गटाने एकत्रित लढल्याने अध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा सुरू होत्या.

जिल्हा बँकेत 21 संचालक आहेत. त्यामध्ये 10 जागा या बिनविरोध झाल्या होत्या. थोरात-विखे एकत्र आल्याने त्यांच्या सहमती एक्स्प्रेने या 10 जागा बिनविरोध मिळवल्या होत्या. मात्र, खासदार निलेश लंके आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते.

(बातमी अपडेट होत आहे)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.