

Sunetra Pawar Bunglow Allotted: अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर लगेचच तासाभरात सुनेत्रा पवार यांचे खातेवाटपही जाहीर झाले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात त्यांना सरकारी निवासस्थान असलेला बंगलाही देण्यात आला आहे. या सर्व गोष्टी केवळ तासाभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावल्या आहेत.
३१ जानेवारी २०२६ रोजी सुनेत्रा अजित पवार यांनी संध्याकाळी ५ वाजता लोकभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. पण त्याला अजित पवारांच्या निधनाची दुःखद अशी किनार आहे. त्यानंतर तासाभरातच मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडं देण्यात येणारे खाते वाटपही जाहीर करण्यात आले. यापूर्वी अजित पवारांकडं जी खाती होती त्यापैकी केवळ अर्थमंत्रीपद न देता राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक आणि वक्फ ही तीन खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात आली आहेत.
दरम्यान, शपथविधी आणि खाते वाटप झाल्यानंतर काही वेळातच सुनेत्रा पवार यांना नागपूर येथील 'विजयगड' हा बंगला क्रमांक 31/1 हे शासकीय निवासस्थानही त्यांना देण्यात आलं आहे. यापूर्वी अजित पवारांसाठीच हा बंगला देण्यात आला होता. त्यावरची केवळ पाटी बदलून आता ती श्रीमती सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री अशी केली आहे. विशेष म्हणजे, राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं अजित पवार यांच्यासाठी विजयगड बंगला नव्याने बांधला. त्यामुळं नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा नागपूरमधील नवा पत्ता विजयगड, GPO चौक असणार आहे.
त्याचबरोबर मुंबईतही देवगिरी हा बंगला अजित पवार यांच्याकडं अनेक वर्षांपासून आहे. आता हा बंगला देखील सुनेत्रा पवार यांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच या बंगल्यावरील केवळ पाटी बदलून ती अजित पवार, उपमुख्यमंत्री ऐवजी श्रीमती सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री अशी होईल, असंही सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.