Sunetra Pawar Meet CM Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Sunetra Pawar Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज बैठक होती. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
Sunetra Pawar | Devendra Fadnavis
Sunetra Pawar | Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. याविषयीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचे अधिकृत कारण समोर आले नाही. मात्र, अर्थमंत्रिपद पुन्हा राष्ट्रवादीला मिळावे,यासाठी ही भेट घेतली असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत देखील राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखाते मिळावे, यासंदर्भात बोलणे झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज कोर कमिटीची बैठक होती. ही बैठक सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडली. पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक पार पडल्यानतंर सुनेत्रा पवार या पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत घेत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत.

सुनेत्रा पवारांच्या ओसडींना नोटीस

मुंढवा येथील सरकारी जमीन व्यवहारातील कथित अनियमितते प्रकरणी सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातील दोन विशेष कार्यकारी अधिकारी ओएसडी यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. विकास पाटील आणि राम चौबे अशी या अधिकाऱ्यांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारी यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून कार्यरत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com