Manikrao Kokate : आमच्यासाठी पक्षच अजित पवार होते, आता सुनेत्राताईंच्या निवडीसाठी आमदारांच्या बैठकीचीही गरज नाही : माणिकराव कोकाटे स्पष्टच बोलले!

Manikrao Kokate statement News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याबाबत शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेण्याची गरज नाही. सर्वांची एकच इच्छा आहे, की सुनेत्राताई पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील सुनेत्राताई पवार यांना करावे, पक्षाची धुरा त्यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे सर्व आमदार आम्ही सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. उद्या होणार असलेल्या आमदारांच्या बैठकीबाबत काही कल्पना नाही. शनिवारी होत असलेल्या बैठकीचा निरोप अजून मिळाला नाही. त्याबाबत कोणत्या नेत्याशी चर्चा झाली नाही. नेतानिवडीबाबत आमचे सर्वांचे एकमत आहे. आमच्यात कसलेच मतभेद नाहीत, असेही माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.

Manikrao Kokate
Nashik BJP Politics : मुंबईसाठी भाजपकडून नाशिकमध्ये तडजोड? शिवसेना व राष्ट्रवादीला सत्तेत घेण्याच्या हालचाली..

दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. राष्ट्रवादीच्या आमदारांचे पंचप्राण, आमचे भवितव्य काळाने हिरावून घेतले. त्यामुळे आमच्या आमदारांची काहीही बोलण्याची मानसिकता नाही. आमचा पक्षच अजितदादा हे होते. आम्ही सर्व आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची भूमिका घेतली, ती फक्त अजित दादांमुळे, असेही माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) म्हणाले.

Manikrao Kokate
Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी होणार, राज्य सरकारने दिले आदेश

गेल्या दोन दिवसात मी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांशी बोललो आहे, त्या सर्वांचं एकमुखी म्हणणं की सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. आम्ही एका मताने ठराव करणार आहोत, त्यांनी आमचं, पक्षाचे नेतृत्व करावे, असेही कोकाटे म्हणाले.

Manikrao Kokate
Ajit Pawar successor : ‘अजितदादांचा उत्तराधिकारी नेमण्याची काहींना खूप घाई झालीय; पण आज वेळ पवार कुटुंबांसोबत उभं राहण्याची’

अजितदादांची खाती देखील त्यांनी सांभाळावीत. आम्ही दोन पत्र तयार करणार आहोत, एक पक्ष आणि निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली हे त्यांनाच माहीत आहे. दिल्लीत काय चर्चा झाली, कदाचित सुनेत्रा वहिनींना माहीत असावे. त्याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही. मात्र आम्ही एकमुखाने सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी आहोत, त्यांनीच आमचे नेतृत्व करावे, असे कोकाटे म्हणाले.

Manikrao Kokate
Ajit Pawar successor : ‘अजितदादांचा उत्तराधिकारी नेमण्याची काहींना खूप घाई झालीय; पण आज वेळ पवार कुटुंबांसोबत उभं राहण्याची’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com