

Mumbai News : राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक व वक्फ, क्रीडा व मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर आता त्यांचा पहिला दौरा ठरला आहे. येत्या दोन दिवसात सुनेत्रा पवार या सातारा जिल्ह्यातील कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार असल्याचे समजते.
राज्यातील वेगवान घडामोडीनंतर शनिवारी दुपारी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विधिमंडळ सभागृह नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांनी राज्यपाल भवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता येत्या दोन दिवसात त्या सातारा जिल्ह्याच्या दौरा करणार असल्याचे पुढे आले आहे.
राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पाच जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामध्ये अजितदादांचे पीएसओ विदीप जाधव यांचेही विमान अपघातात निधन झाले होते. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगावचे होते. विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
विदीप जाधव यांच्या पार्थिवावर त्यांच्या तरडगाव या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तरडगावमध्ये 29 जानेवारी रोजी रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्यविधी करण्यात आले. विदीप जाधव यांच्या कुटूंबाची आमदार रोहित पवारांनी शनिवारीच भेट घेतली होती. त्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला जाणार आहेत.
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विदीप जाधव यांच्या जाण्याने पोलीस दल, कुटुंबीय, त्यांचा मित्रपरिवार आणि गावावर मोठी शोककळा पसरली आहे. येत्या दोन दिवसातच सुनेत्रा पवार सातारा जिल्ह्याच्या दौरा करणार आहेत. यावेळी कराडमधील माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.