MP Dhairyasheel Patil and BJP leaders welcoming Shiv Sena and UBT group members who joined BJP during a political induction event in Sudhagad, Raigad.
MP Dhairyasheel Patil and BJP leaders welcoming Shiv Sena and UBT group members who joined BJP during a political induction event in Sudhagad, Raigad.Sarkarnama

Raigad BJP News : ऐन निवडणुकीत राजकीय भूकंप! शिवसेना व 'उबाठा'ला खिंडार पाडत भाजप खासदाराचा मास्टरस्ट्रोक; अनेकांच्या हाती 'कमळ'

Sudhagad Politics : सुधागड तालुक्यात शिवसेना व उबाठा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने रायगडच्या राजकारणात मोठा बदल झाला असून भाजपची ताकद वाढली आहे.
Published on

अमित गवळे

Raigad News : पाली सुधागड तालुक्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. शनिवारी (ता. 31) वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांसह शिंदे शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या पक्षांतरामुळे सुधागडात शिवसेना आणि शिवसेना 'उबाठा' पक्षाला जबरदस्त धक्का बसला असून भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे. खासदार धैर्यशील पाटील व प्रकाश देसाईंची भूमिका या पक्षप्रवेशासाठी महत्त्वाची ठरली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाश देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड. निलिमाताई पाटील, मिलिंद देशमुख, रवींद्र देशमुख आणि तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गिरीश गोविंद दळवी यांच्या नेतृत्वाखाली जांभूळपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी आणि सात सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

यावेळी कार्यकर्त्यांचे स्वागत करताना खासदार धैर्यशील पाटील म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता भाजपमध्ये सामील होत आहे. विकासाचे व्हिजन अधिक गतिमान करून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करू. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जनतेने विकासासाठी भाजपला साथ द्यावी.

MP Dhairyasheel Patil and BJP leaders welcoming Shiv Sena and UBT group members who joined BJP during a political induction event in Sudhagad, Raigad.
BJP Politics in Kokan : कोकणात राजकीय भूकंप! राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही मोठा धक्का?, शिवसेनेचा युवा नेता महायुतीच्या वाटेवर

भाजप नेते प्रकाश देसाई यांनी ग्वाही दिली की, "सुधागडसह संपूर्ण जिल्ह्यात भाजप संघटनात्मक दृष्ट्या भक्कम होत आहे. ज्या अपेक्षेने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता शाश्वत आणि सर्वांगीण विकास घडवून आणला जाईल.

MP Dhairyasheel Patil and BJP leaders welcoming Shiv Sena and UBT group members who joined BJP during a political induction event in Sudhagad, Raigad.
Raigad Crime : कोकणात ZP च्या तोंडावर पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ! कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

वऱ्हाड-जांभूळपाडा सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी, सदस्य प्रभाकर खंडागळे, सुशील मालुसरे, सविता बामगुडे, सुषमा वाघमारे, रमेश पवार, मनीषा गोरे, धोंडी पवार तसेच राजेश शितोळे, धनंजय काकडे, योगेश खंडागळे, सुरेश चव्हाण, विशाल देशमुख आणि इतर शेकडो कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सोहळ्याला सतीश देसाई, ऍड. सुभाष पाटील, विलास पालवे, विशाल गुरव आणि संदेश लोंढे यांसह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com