Sunil Tatkare in Lok Sabha : सुनिल तटकरे विरोधकांची झोप उडवत असताना शिंदेंचे लाडके खासदार शेजारी बसून काय करत होते? पाहा Video

Sunil Tatkare Lok Sabha speech : सुनिल तटकरे यांनी लोकसभेत बुधवारी निवडणूक सुधारणांवर बोलताना काँग्रेससह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
Naresh Mhaske, Sunil Tatkare
Naresh Mhaske, Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha session updates : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यामध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. आमदार महेंद्र दळवी व आमदार महेंद्र थोरवे आणि तटकरेंमध्ये कलगीतुरा सुरू आहे.

खासदार तटकरे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत थोरवेंची खिल्ली उडवत व्हिडीओ प्रकरणाची केंद्रीय व राज्य तपास यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तटकरेंनी नोटांची बंडले दिसत असलेला व्हिडीओ दानवेंना दिल्याचा आरोप थोरवेंनी केला होता. त्यावरून तटकरेंनीही पलटवार केला आहे.

दुसरीकडे दिल्लीत लोकसभेत निवडणूक सुधारणांवर मंगळवारपासून चर्चा सुरू आहे. आज सुनिल तटकरे यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेस व मित्रपक्षांवर जोरदार शरसंधान साधले. इंदिरा गांधीपासूनच्या निवडणुकांचा इतिहास सांगत त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांचाही उल्लेख करत निवडणुकांमध्ये सुधारणा का आवश्यक आहेत, हे सांगितले.

Naresh Mhaske, Sunil Tatkare
Rahul Gandhi News : राहुल गांधी काल फाडफाड बोलले; आज PM मोदी, शहांसोबत हायप्रोफाईल बैठक

तटकरे बोलत असताना त्यांच्याशेजारीच शिंदेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील खासदार नरेश म्हस्के हाताची घडी घालून बसले होते. तटकरे जवळपास १४ मिनिटे अत्यंत आक्रमकपणे बोलत होते. विरोधकांची झोप उडले असे तिरकस बाण ते सोडत होते. पण शेजारी बसलेल्या म्हस्के यांची झोप या शाब्दिक बाणांनी उडाली नाही. उलट त्यांच्या डुलक्या सुरू असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. भाषण सुरू असताना अनेकदा त्यांचे डोळे बंद होत होते.

Naresh Mhaske, Sunil Tatkare
Amit Shah News : काँग्रेसच्या आव्हानानंतर शहांनी काही तासांतच दिली ‘त्या’ नेत्यांची यादी; 9 घटनांचा उल्लेख अन् केली बोलती बंद

दरम्यान, तटकरे यांनी लोकसभेत महाविकास आघाडीवरही टीका केली. लोकसभेत ३१ खासदार निवडून आले, त्यावेळी ईव्हीएम बरोबर होते. त्यावेळी वोटचोरी नव्हती. पण सहा महिन्यांत विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच ईव्हीएममध्ये दोष झाला, अशी आवई उठविली गेली. सशक्त लोकशाहीवर तुमचा विश्वास नाही, अशी टीका तटकरेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com