Rahul Gandhi News : राहुल गांधी काल फाडफाड बोलले; आज PM मोदी, शहांसोबत हायप्रोफाईल बैठक

PM Modi Amit Shah meeting केंद्रीय माहिती आयुक्तालयामध्ये मुख्य आयुक्तांसह दहा माहिती आयुक्त असतात. सध्या मुख्य आयुक्तांसह आठ पदे रिक्त आहेत.
Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi
Amit Shah, Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Parliament session updates : लोकसभेत मंगळवारी निवडणूक सुधारणांवर चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार भाषण ठोकले. या भाषणादरम्यान त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीपासून महाराष्ट्र, हरियाणा, बिहारसह विविध राज्यांमधील निवडणुकीदरम्यान झालेल्या कथित घोळावरून जोरदार हल्लाबोल चढविला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यान जोरदार गदारोळही झाला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. कालच्या रोखठोक भाषणानंतर आज राहुल गांधी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संसदेत भेटणार आहे. या तिघांच्या भेटीवरून आता चर्चांना उधाण आले आहे. ही बैठक अत्यंत हायप्रोफाईल मानली जात असून अधिवेशन सुरू असतानाच भेट होत असल्याने महत्व प्राप्त झाले आहे.

बैठकीचे कारणही समोर आले आहे. तिघांच्या बैठकीमध्ये देशाच्या मुख्य माहिती आयुक्तांची निवड केली जाणार असल्याचे समजते. तसेच या तिघांच्या पॅनेलकडून आठ रिक्त माहिती आयुक्तांच्या पदांबाबतही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकारने आज या पदांवर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्टात दिली आहे.

Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi
Amit Shah News : काँग्रेसच्या आव्हानानंतर शहांनी काही तासांतच दिली ‘त्या’ नेत्यांची यादी; 9 घटनांचा उल्लेख अन् केली बोलती बंद

राहुल गांधी यांनी काल लोकसभेत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता. निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या पॅनेलमध्ये सरन्यायाधीश का नाहीत, त्यांना का हटविण्यात आले, असे सवाल राहुल यांनी केले होते. ते याबाबत सुरूवातीलापासून आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत. सरकारने कायद्यात बदल करून सरन्यायाधीशांना पॅनेलमधून हटविल्याचे ते वारंवार सांगत आहेत.

मुख्य माहिती आयुक्त हे पदही अत्यंत महत्वाचे आहे. माहिती अधिकाराशी संबंधित महत्वाची जबाबदारी आयुक्तांवर असते. त्यांची निवड करणाऱ्या तिघांच्या पॅनेलमध्येही राहुल गांधी आहेत. त्यामुळे या बैठकीतही राहुल गांधी एका त्रयस्थ सदस्याबाबतचा आग्रह धरणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Amit Shah, Rahul Gandhi, Narendra Modi
Sansad winter session : प्रियांका गांधींनी 'संसद' गाजवली; मोदीही कोसो दूर, एका खासदाराच्या वादग्रस्त विधानानेही खळबळ

दरम्यान, केंद्रीय माहिती आयुक्तालयामध्ये मुख्य आयुक्तांसह दहा माहिती आयुक्त असतात. सध्या मुख्य आयुक्तांसह आठ पदे रिक्त आहेत. आरटीआयची तब्बल ३० हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. हिरालाल समारिया हे मुख्य माहिती आयुक्त या पदावरून १३ सप्टेंबरला निवृत्त झाले आहेत. ता. ६ नोव्हेंबर २०२३ पासून ते या पदावर होत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com