NCP Rajyasabha Candidature : नवनीत राणांच्या उमेदवारी बाबत मोठी अपडेट, सुनील तटकरेंनी खरं काय ते सांगितलं, म्हणाले 'विषय आता...'

Sunil Tatkare Navneet Rana Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवारी नवनीत राणांना मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, सुनील तटकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना यावर स्पष्ट काय ते सांगितले आहे.
Sunil Tatkare  Chhagan Bhujbal  Navneet Rana
Sunil Tatkare Chhagan Bhujbal Navneet Rana sarkarnama
Published on
Updated on

Sunil Tatkare News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा उमेदवारीसाठी मोठ्या घडामोडी घडत आहेत. नवनीत राणा यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राणा यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चा सुरू झाल्या. छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना अचानक नवनीत राणांच्या नावाची चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत खरे काय ते सांगून टाकले.

सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीकडून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याबाबतचा विषय संपलेला आहे.आज संध्याकाळी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यामध्ये उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे.'

तटकरे यांनी नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोअर कमिटीची संध्याकाळी बैठक होणार आहेत. त्यामध्ये अंतिम निर्णय सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आम्ही घेऊ, असे म्हटले आहे.

भुजबळांच्या अटीमुळे अडचण

मंत्री छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, आपण राज्यसभेत जात असताना आपला पुतण्या समीर भुजबळ याला मंत्रिमंडळात घ्यावे, अशी त्यांची अट आहे. या अटीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, दिल्लीत विचारून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने लगेच समीर यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com