Murlidhar Mohol News : मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णी, चंद्रकांतदादाची ताकद; कोथरूड भाजपचे नवे पॉवर स्टेशन

Pune Kothrud Will be New Power Center for BJP as Murlidhar Mohol Gets Ministry : पुण्यात अण्णा जोशी, प्रदीप रावत व गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक जिंकून दाखवली. बापट हे पाचवेळा आमदार एकवेळ खासदार राहिल्याने भाजपमध्ये हेवीवेट लीडर ते ठरले.
Chandrakant Pati, Medha Kulkarni, Murlidhar Mohol,
Chandrakant Pati, Medha Kulkarni, Murlidhar Mohol, Sarkarnama

Pune BJP News : पुण्यात भारतीय जनता पक्षाला मानणारा वर्ग अलीकडच्या काळातच आहे असे नव्हे तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळातही होता. त्या आधी फारसे नसले तर काही प्रमाणात भाजपचे लीडर होते.

या मतदारसंघात मोदी-शहा यांच्या आदींच्या काळातही भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात होता. त्याकाळी गोपीनाथ मुंडे यांना मानणारी मंडळीही होती. यावेळी शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत महापालिकेत भाजपचे नगरसेवक होते. आता त्यामध्ये वाढ होऊन नगरसेवकांचा आकडा 100 पर्यंत पोचला आहे.

पुण्यात अण्णा जोशी, प्रदीप रावत व गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणूक जिंकून दाखवली. बापट हे पाचवेळा आमदार एकवेळ खासदार राहिल्याने भाजपमध्ये हेवीवेट लीडर ते ठरले. परिणामी बापट हे कसब्याचे नेतृत्व करीत असल्याने सारी सूत्र कसब्यातून हालत होती. त्यामुळे बापट यांच्यामुळे कसब्यात भाजपचे (BJP) पॉवर स्टेशन राहिल.

Chandrakant Pati, Medha Kulkarni, Murlidhar Mohol,
Loksabha Election Result 2024 : विधानसभेला महाविकास आघाडी 164 जागा जिंकणार? लोकसभेच्या निकालाने महायुती चिंतेत

त्यानंतर खऱ्या अर्थाने २०१४ पासून भाजपची घोडदौड सुरु झाली. त्याच वर्षी शहरातील आठही मतदारसंघात भाजपचे आमदार झाले. त्यानंतर 2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा दबदबा वाढला. या निवडणुकीत 98 नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले.

पालिकेत सत्ता आली आणि अत्यंत महत्वाची पदे कोथरूडकर सरकली. या निवडणुकीनंतर महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) झाले. त्यानंतर लगेचच मोहोळ महापौर झाले. मोहोळ पुण्याचे खासदार झाले अन त्यांनतर केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यामुळे गेल्या काही दिवसात कोथरूडमध्ये भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे महापालिकेत सुद्धा याच भागातून 12 ते 13 नगरसेवक होते. त्यासोबतच कोथरूडचे प्रतिनिधित्व करणारे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे राज्य सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्रिपद देण्यात आले.

पुणे शहर भाजपचे मध्यवर्ती कार्यालय सुद्धा कोथरूड मध्येच आहे. गेल्या अडीच तीन महिन्यातच मेधा कुलकर्णी या राज्यसभेवर गेल्या. त्यामुळे आता भाजपमध्ये नवीन पॉवर स्टेशन म्हणून कोथरुडकर पहिले जात आहे.

Chandrakant Pati, Medha Kulkarni, Murlidhar Mohol,
Lok Sabha Election Result News : वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याने कुणाला दाखवली 'दिल्ली'; कुणाला बसवलं घरी!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com