Local Body Elections : लागा तयारीला! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांत होणार! सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश

Supreme Court's Directive on Maharashtra Local Body Elections : सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या.
Supreme Court mandates Maharashtra to hold local body elections within four months, ensuring OBC reservations align with pre-2022 guidelines.
Supreme Court mandates Maharashtra to hold local body elections within four months, ensuring OBC reservations align with pre-2022 guidelines. Sarkarnama
Published on
Updated on

Implementation of OBC Reservation in Upcoming Elections : मागील अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने आज याबाबत महत्वाचा आदेश देत पुढील चार महिन्यांत निवडणूका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यासाठी पुढील चार आठवड्यांत याबाबतच नोटिफिकेशन काढण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.

कोर्टाच्या आदेशामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. आता कोर्टाने ओबीसी आरक्षणाची 2022 पूर्वीची असलेली स्थिती कायम ठेवत निवडणुका घेण्याचा महत्वपूर्ण आदेश दिला आहे. 2022 मध्ये ओबीसी आरक्षणाबाबत जी परिस्थिती असेल, तीच राहील, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

Supreme Court mandates Maharashtra to hold local body elections within four months, ensuring OBC reservations align with pre-2022 guidelines.
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं ऐतिहासिक पाऊल; न्यायाधीशांची संपत्ती पहिल्यांदाच उघड, CJI किती कोटींचे मालक?

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले की, महाराष्ट्रात आज पाच वर्षांहून अधिक प्रशासक कार्यरत आहे. राज्यघटनेच्या तरतुदीच्या हे विपरीत आहे. सुप्रीम कोर्टाने असेही सांगितले की, अनियमितता आढळून आल्या आहेत. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी असायला हवे. कोर्टाने निवडणुका घेण्यास कुणाचा विरोध आहे का, असे विचारल्यानंतर कोर्टाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले.

चार आठवड्यांत नोटिफिकेशन काढून चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामध्ये आता 2022 पूर्वी ओबीसी आरक्षणाबाबत जी स्थिती होती, तशीच राहील. त्यानुसार पूर्वी जेवढ्या जागा होत्या, तेवढ्याच जागा कायम राहणार आहेत. ज्याठिकाणी निवडणुका घेणे शक्य होणार नाही, त्याबाबत अडचण असल्यास सुप्रीम कोर्टात अर्ज करून निवडणूक आयोगाला वेळ वाढवून घेता येऊ शकतो, असेही वकिलांनी सांगितले.

Supreme Court mandates Maharashtra to hold local body elections within four months, ensuring OBC reservations align with pre-2022 guidelines.
India Vs Pakistan Update : युध्दाआधीच पाकिस्तानची जगात फजिती; बंद दाराआडच्या चर्चेत ‘या’ तिखट प्रश्नांनी 'बोलती बंद'

निवडणुका घेण्यास आक्षेप नसल्याचे यावेळी राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावरून सुनावणी सुरूच राहणार आहे. याबाबतचा अंतिम निकाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वांना मान्य करावा लागणार असल्याचेही वकिलांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com