Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा एससी एसटी आरक्षणाबाबत मोठा निर्णय, न्यायालयाच्या निकाला विरोधात...

Sub classification sc st reservation Prakash Ambedkar : उपवर्गीकरण आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांमध्ये एकमत दिसून येत नाही. केंद्र सरकारामध्ये असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाने न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोध केला होता.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : सर्वोच्च न्यायालयाने एससी एसटी आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय देताना उपवर्गीकरण तसेच क्रिमीलेयर लागू करण्यास सांगितले होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टाच्या या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, आता उपवर्गीकरण आरक्षणाच्या निर्णया विरोधात प्रकाश आंबेडकर मोठं पाऊल उचलणार आहेत.

सुप्रीम कोर्टाने एससी एससटी आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या उपवर्गीकरण आणि क्रिमीलेयरच्या विरोधात पुनर्विचार याचिका प्रकाश आंबेडकर दाखल करणार आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत सांगितले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांच्या अनुसूचित जाती (SC)मध्ये क्रिमीलेयर आणि उपवर्गीकरणाला परवानगी देणाऱ्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रतीक बोंबार्डे यांच्यामार्फत आज पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, पुनर्विचार याचिकेतील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.मी हे प्रकरण न्यायालयात हाताळण्यास वकिलांना मदत करीन.

Prakash Ambedkar
Udayanraje On Statue Collapse : उदयनराजेंची पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया; राजकारण करणाऱ्यांना झापलं

उपवर्गीकरण आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांमध्ये एकमत दिसून येत नाही. केंद्र सरकारामध्ये असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाने न्यायालयाच्या या निर्णयाचा विरोध केला होता. या निर्णयाला विरोध करण्यासाठी 21 ऑगस्टला संप पुकारण्यात आला होता. या बंदला प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला होता.

रामदास आठवलेंचा पाठींबा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एसी एसी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाला आपला पाठींबा दर्शवला होता. तसेच क्रिमीलेयर बाबत आठवले यांच्या पक्षाने विरोध दर्शवला आहे.

Prakash Ambedkar
Jitesh Antapurkar News : मराठवाड्यात काँग्रेसला मोठा झटका; आमदार जितेश अंतापूरकरांची पुढची वाटचाल ठरली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com