Ajit Pawar Died : अडीच वर्षांनी एकत्र येण्याचा 'ताई-दादां'चा तोच अखेरचा क्षण ठरला!

Ajit Pawar Dead : पुणे महापालिका जाहीरनामा प्रसिद्ध करताना सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र आले होते. तो क्षण अजित पवारांचा अखेरचा राजकीय स्मृतीक्षण ठरला.
Ajit Pawar, Supriya Sule during the release of the NCP joint manifesto for the Pune PMC election, highlighting the free metro proposal
Ajit Pawar, Supriya Sule during the release of the NCP joint manifesto for the Pune PMC election, highlighting the free metro proposalSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Death in Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर तब्बल अडीच वर्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे बहीणभाऊ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त जाहीरनामा प्रकाशनाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. "दादा-ताई' एकत्र दिसल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आले.

पुढे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत दादा-ताई पुन्हा गुंतवून गेले. सार्वजनिक व्यासपीठावर एकत्र दिसण्याचा दोघांचा तो "क्षण' अखेरचा ठरला. तब्बल अडीच वर्षांनी एकत्र दिसलेली ताई-दादाची जोडी अखेर फुटली ती कायमचीच! हा भावनिक क्षण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून गेला!

महापालिका निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, या दोन्ही पक्षांनी निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रारंभी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. मात्र दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुळे यांनी दोन पावले मागे घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीची सूत्रे हाती घेतली.

दोन्ही पक्षांच्या उमेदवारी निश्‍चितीपासून नाराज झालेल्यांची समजूत काढण्यापर्यंतची भूमिका दादांनी वठवली. १० जानेवारी २०२६ रोजी दोन्ही पक्षांचा संयुक्त जाहीरनामा जाहीर केला जाणार होता. त्यासाठी सुळे या देखील उपस्थित राहणार होत्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जुलै २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर तब्बल अडीच वर्षानंतर अखेर ताई-दादा सार्वजनिक व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र आले.

Ajit Pawar, Supriya Sule during the release of the NCP joint manifesto for the Pune PMC election, highlighting the free metro proposal
Ajit Pawar plane crash: संजय गांधी ते अजित पवार; विमान अपघाताने हिरावले महत्त्वाचे नेते!

दादा-ताईंच्या हस्ते पक्षाच्या "हमीपत्र' या जाहीरनाम्याचे प्रकाशन पत्रकार परिषदेत करण्यात आले. पवार यांनी मोफत पीएमपीएल व मेट्रो प्रवासाची घोषणा केली. त्यावेळी सुळे यांनीही मोफत प्रवासाच्या फक्त घोषणा नाहीत, तर त्या प्रत्यक्षात उतरविण्याचे नियोजन दादांकडे असल्याचे सांगत निवडणुकीची सूत्रेही दादांकडे सोपविली.

ताई-दादा एकत्र येण्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून तरुण कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच ताई-दादा एकत्र येण्याचा तो क्षण मोठ्या आनंदाने अनुभवला. त्या क्षणाचे जोरदार स्वागतही केले.

Ajit Pawar, Supriya Sule during the release of the NCP joint manifesto for the Pune PMC election, highlighting the free metro proposal
Ajit Pawar Death : अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच हसन मुश्रीफ ढसाढसा रडले, 'आम्ही पोरके झालो...'

पुढे महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर, पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गुंतून गेले, तर सुळे या संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला गेल्या. अखेर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संयुक्त जाहीरनामा प्रकाशनाचा सार्वजनिक व्यासपीठावरील ताई-दादाचा एकत्र येण्याचा क्षणच अखेर क्षण ठरला. हाच क्षण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनाला चटका लावून गेला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com