Supriya Sule : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुप्रिया सुळेंकडून खास गिफ्ट! सरकारचेही मानले आभार

Supriya Sule PM Narendra Modi : सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त या देशांचा दौरा करुन देशाची भूमिका मांडली.
Supriya Sule presents books on Yashwantrao Chavan to PM Modi, highlighting Maharashtra’s political heritage
Supriya Sule presents books on Yashwantrao Chavan to PM Modi, highlighting Maharashtra’s political heritagesarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule News : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशवादाच्याविरोधात भारताची भूमिका जगाला सांगण्यासाठी परदेशी शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. दहशतवादाच्या विरोधात भारताची भूमिका जागतिक व्यासपीठावर मांडण्यासाठी पाठविण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांच्या सदस्यांची मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

या भेटीत खासदार सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणाऱ्या 'वाय. बी. चव्हाण अ पिक्चरल बायोग्राफी' आणि 'वाय. बी. चव्हाण सिलेक्टेड स्पीचेस् इन पार्लिमेंट' ही दोन गिफ्ट दिली.

सुळे यांनी आपल्या ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुस्तके भेट दिल्याची सांगितले. तसेच अतिशय महत्त्वाच्या अशा एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. या शिष्टमंडळाने कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त या देशांचा दौरा करुन देशाची भूमिका मांडल्याचे सांगितले.

Supriya Sule presents books on Yashwantrao Chavan to PM Modi, highlighting Maharashtra’s political heritage
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत आज 'गुड न्यूज' मिळणार? कोर्ट घेणार मोठा निर्णय!

पंतप्रधानांचे मानले आभार

सुप्रिया सुळे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना कतार, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया आणि इजिप्त या देशांमध्ये भारताची भूमिका रोखठोक मांडली. सुळे यांच्या नेतृत्वाचे कौतुक देखील करण्यात आले. दरम्यान, दौऱ्यासाठी आपली निवड करुन एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली याबद्दल भारत सरकार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संसदीय कार्यमंत्री किरेनजी रिजेजू यांचे सुप्रिया सुळे यांनी आभार मानले.

पंतप्रधान 59 सदस्यांना भेटले

ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशात सात शिष्टमंडळ पाठवण्यात आली होती. या सात शिष्टमंडळातील सहभागी 59 सदस्यांना भेटले. ज्यामध्ये 51 नेता और 8 राजदूत यांचा समावेश होता. पंतप्रधान मोदींनी शिष्टमंडळातील सदस्यांशी चर्चा केली. या परदेशात गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व रविशंकर प्रसाद, बैजयंत पांडा, संजय कुमार झा, कनिमोळी करुणानिधी, सुप्रिया सुळे, शशि थरूर और श्रीकांत शिंदे यांनी केले.

Supriya Sule presents books on Yashwantrao Chavan to PM Modi, highlighting Maharashtra’s political heritage
Gopinath Munde Memorial Controversy: 'AIMIM' इम्तियाज जलील यांना थेट बीड, परळीतून धमक्या; काय होतं कारण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com