Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे-जयंत पाटील घेणार राज्यपाल बैस यांची भेट

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणच्या संदर्भात आमरण उपोषण करत आहेत.
Maratha Reservation :
Maratha Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आज (ता.२९) दुपारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्यपालांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात येणार आहे.

एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणच्या संदर्भात आमरण उपोषण करत आहेत. पण या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालून हे प्रकरण सोडवावे, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांना करण्यात येणार आहे.

Maratha Reservation :
Jitendra Awhad On Eknath Shinde : 'वाह रे शिंदे तेरा खेल, सस्ता बिअर-मेहेंगा तेल..' ; आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं!

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात वातावरण चांगलेच तापले आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यभरातून त्यांच्या या आवाहनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमदार खासदारांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना अडवून त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारले जात आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार चांगलेच कात्रीत सापडले आहेत.

तर दुसरीकडे, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. ४० दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केल्याने वातवरण चिघळण्याची शक्यता आहे. ही सर्व परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आज सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील राज्यपाल बैस यांची भेट घेणार आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Maratha Reservation :
Administration : ‘भाऊंचे’प्रयत्न फळास आले, बावन्न गावांत तलाठी कार्यालय मंजूर झाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com