आता विलिनीकरणाच्या चर्चांचा कंटाळा आलाय...", सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली मनातील खदखद

Supriya Sule latest statement on merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या वारंवार होणाऱ्या चर्चांचा कंटाळा आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash Probe
Supriya Sule Sarkarnama
Published on: 
Updated on: 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत वारंवार होणाऱ्या चर्चांचा आता कंटाळा आल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. हा विषय आपल्यासाठी राजकारणाचा नसून अत्यंत भावनिक असल्याचे सांगताना त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या नात्याचाही उल्लेख केला.

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. केवळ त्यांच्याशीच नव्हे, तर दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्येही यासंदर्भात संवाद झाला होता. या चर्चांचे व्हिडिओदेखील वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर विलीनीकरणासाठी तारीखही निश्चित झाली होती, असे त्यांनी नमूद केले.

Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash Probe
Jalgaon Bank Election: एकनाथ शिंदेंच्या आमदारानं 'अदृश्य' शक्तीचा डाव उधळला; भाजपची कोंडी! आमदार पुत्राचा अर्ज वैध

अजित पवार यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणी सांगताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की, दादांसोबत घालवलेले अनेक आनंदाचे आणि गमतीशीर क्षण आजही त्यांच्या मोबाईलमध्ये जपून ठेवले आहेत. मात्र, या आठवणी त्यांच्या आणि भावाच्या नात्याशी संबंधित आहेत. त्यांचा राजकीय चर्चांशी संबंध जोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देताना सुप्रिया सुळे यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. त्या म्हणाल्या की, "ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्या मनात, माझ्या अंतःकरणात आणि आमच्या पक्षामध्ये विलीनीकरणाच्या विषयाला पूर्णविराम लागला आहे."

तसेच अजित पवार गटाकडून या विषयावर वेळोवेळी करण्यात आलेल्या विधानांना आपण कधीही प्रत्युत्तर दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही यावर प्रतिक्रिया देण्याचा आपला विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash Probe
Ayushman Card : आयुष्मान कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ 112 आजारांवर खाजगीत मोफत उपचार बंद! वाचा सविस्तर

"मी माझा भाऊ गमावला आहे आणि आमच्या घरातील कर्ता पुरुष गेला आहे," असे सांगताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अजित पवार यांच्यासोबतचे प्रेमाचे नाते आयुष्यभर कायम राहील, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा राजकीय वळण मिळाले आहे. मात्र, हा विषय आपल्यासाठी वैयक्तिक आणि भावनिक असल्याचे सांगत त्यांनी यावर वारंवार चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.