Supriya Sule : महिलांना महाराष्ट्रात फिरताना भीती वाटतेय! सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं

Supriya Sule on Maharashtra Government : सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील हिंसाचारानंतर पोलिस ठाण्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू, या घटनांनी राज्य सरकारची कोंडी झाली आहे. तर विरोधकांकडूनही जोरदार प्रहार केले जात आहेत.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

गेल्या महिन्याभरात झालेल्या हत्या आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील हिंसाचारानंतर पोलिस ठाण्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू, या घटनांनी राज्य सरकारची कोंडी झाली आहे. तर विरोधकांकडूनही जोरदार प्रहार केले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल? माझ्या मनात भिती वाटतेय, असे विधान केले आहे. तसेच मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भिती वाटली नाही. पण आता महिला म्हणतात, आम्हाला भीती वाटतेय, अशी प्रतिक्रियाही खासदार सुळे (Supriya Sule) यांनी दिली व्यक्त केली आहे.

Supriya Sule
Yashomati Thakur : 'गरिबाचं पोरगं मेलं, अन् यांना राजकारणाचं पडलं'; CM फडणवीसांवर यशोमती ठाकूर भडकल्या

राजकारणाच्या पुढे जाऊन नात्यातला ओलावा कुणाचा असेल तर त्यांचं नाव शरद पवार आहे. बीड आणि परभणीला पहिले साहेब गेले. त्यानंतर सत्तेमधील जे इतके दिवस महाराष्ट्रातच होते ते आता जात आहेत. पण पहिले जाणारे आमचे खा. बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) जे पार्लमेंन्ट सोडून बीडला गेले. पवार साहेब हे पहिले नेते आहेत जे बीड आणि परभणीला जाऊन आले.

मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की हा विषय अतिशय गंभीर आहे. या संदर्भात एसआयटी लावली आहे, पण पोलिसांची बदली केलीय पण त्यावरून प्रश्न सुटत नाहीत. याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर कशाला अन्याय करता. कदाचित कोणीतरी मोठ्या माणसाने त्याला ऑर्डर दिली असेल. परभणीच्या घटनेमागे नक्की कोण आहे हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे.

Supriya Sule
Ban on EVM : निवडणुकीनंतर 'या' देशांनी EVM वर घातली बंदी, आता बॅलेट पेपरवर मतदान

ज्या क्रूर पद्धतीने या दोन्ही घटना झाल्यात त्या दोन्ही घटना सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणाऱ्या आहेत. बीड आणि परभणीच्या घटना अतिशय अस्वस्थ करणाऱ्या आहेत.आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात अशा घटना होऊ शकतात याचा मला विश्वास बसत नाही. जे धक्कादायक आहे. सिनेमात पाहिलेय ते वास्तव आज महाराष्ट्रात दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com