Yashomati Thakur : 'गरिबाचं पोरगं मेलं, अन् यांना राजकारणाचं पडलं'; CM फडणवीसांवर यशोमती ठाकूर भडकल्या

Amravati Congress Yashomati Thakur BJP CM Devendra Fadnavis Congress Rahul Gandhi Parbhani : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर CM देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला यशोमती ठाकूर यांचे जोरदार प्रत्युत्तर.
Yashomati Thakur
Yashomati Thakur Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजप नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 'न्याय घेणारच, असे सांगून गरिबाचं पोरगं मेलं, यांना त्यात राजकारण दिसते', असा टोला देखील यशोमती ठाकूर यांनी लगावला.

संविधानाची विटंबना परभणी झाल्यानंतर तिथं हिंसाचार उफळला होता. पोलिसांनी त्यावेळी दंगेखोरांना ताब्यात घेताना बळाचा वापर केला. त्यात काहींना ताब्यात घेण्यात आलं. सोमनाथ सूर्यवंशी याला देखील पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं होते. न्यायालयीन कोठडीत असताना, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. सोमनाथ यांच्या मृत्यूवर त्याच्या नातेवाईकांना आणि आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

Yashomati Thakur
Dhananjay Sawant : 'माझ्या जीवाला काही झाल्यास पोलिस जबाबदार'; धनंजय सावंत फडणवीस अन् शिंदेंची भेट घेणार

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) काल परभणी इथं येत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पोलिसा्ंकडून सोमनाथाचा खून झाल्याचा आरोप केला. राहुल गांधींच्या या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगले तापले आणि महायुतीने राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर आगपाखड केली.

Yashomati Thakur
Chhagan Bhujbal : कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळांना पुन्हा डिवचले...

राहुल गांधी यांच्या या दौऱ्यावर CM देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. द्वेष पसरविण्यासाठी आणि फक्त राजकारणासाठी राहुल गांधी यांचा हा दौरा असल्याचे म्हटले. CM फडणवीस यांच्या या टीकेला अमरावतीमधील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

गरिबाचं पोरगं मेलं, तर त्याला 'राजकारण' म्हणायचं आणि श्रीमंतांची पोरं गाडीने गरिब लोकांना उडवतो, त्याचे काय? त्याला राजकारण म्हणायचं नाही का?, असा सवाल ठाकूर यांनी CM फडणवीस यांना केला. हे जे काही होत आहे, हे सगळं चुकीचं होत आहे. सत्ताधारी भाजप संविधानाला तडे देण्याचं काम करत आहेत. परंतु आम्ही न्यायासाठी लढत राहणार. ज्या ज्या वेळेला कोणावर अन्याय होईल, त्यावेळेला आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा ठाकूर यांनी दिला.

'याला राजकारण नाही म्हणत मुख्यमंत्री साहेब, याला याला न्यायाची मागणी म्हणतात. अन् न्याय झाला पाहिजे. न्याय बीडमध्ये झाला पाहिजे, न्याय परभणीमध्ये झाला पाहिजे. नाहीतर मग तुम्ही होम मिनिस्टर पद सोडलं पाहिजे', असेही ठाकूर यांनी म्हंटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com