Supriya Sule On Dharmarao Atram : 'स्त्रीभ्रूण हत्येसारखी एका वडिलांची भाषा'; सुप्रिया सुळेंनी मंत्री आत्रामांना फटकारलं

Supriya Sule reaction to the statement made by her father Dharmarao Atram on Bhagyashree Atram : धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया.
Supriya Sule On Dharmarao Atram
Supriya Sule On Dharmarao Atram Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय. या प्रवेशापूर्वी भाग्यश्री यांचे वडील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलीवर खूप जहरी टीका केली होती. 'अशा मुलीला नदीत फेकून दिलं पाहिजे', अशा कठोर शब्दात कठोर टीका केली होती.

यावर सुप्रिया सुळे यांनी 'आत्राम यांची ही भाषा स्त्रीभ्रूण हत्या जशी होते, तशी एका वडिलांची भाषा होती, संस्कृत महाराष्ट्राला आणि नात्यांमध्ये, अशी भाषा पहिल्यादांच ऐकली', अशा शब्दात फटकारलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे सांगली दौऱ्यावर होत्या. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात वाढलेल्या इनकमिंगवर, अजित पवार गटातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी केलेल्या पक्षप्रवेशावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Supriya Sule On Dharmarao Atram
Ajit Pawar And Supriya Sule : महायुतीत अजितदादा एकटे पडलेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'तो भाजप...'

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "किती दुर्दैवी आहे, मी आयुष्यात एका वडिलांनं लेकीला नदीत फेकून देईल, असं भाषा कधीही महाराष्ट्रात ऐकलं नव्हतं. हे वडिलांचं धक्कादायक असे विधान होतं. बहीण म्हणून आमची नैतिक जबाबदारी होती, आम्ही तिथं जावं. स्त्रीभ्रूण हत्या होती, तशी हत्या करणारी वडिलांची भाषा होती. वडिलांना ही भाषा शोभत नाही. कोणत्या नात्यात ही भाषा शोभते?" वडिलांच्या या भाषेचा मुलीला किती धक्का बसला, असेल याचा विचार करा. त्यामुळे तिला आधार देणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही तिच्यामागं खंबीरपणे उभं आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Supriya Sule On Dharmarao Atram
Video NCP Politics : अजित पवारांना परतीचे दार बंदच, बारामतीसाठी देखील खास रणनीती?

यामिनी जाधवांचे बुरखा वाटप

भागखळ्याच्या शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मतदार संघात 1000 बुरखा वाटप केलं. त्यावर खासदार सुळे यांनी विचारलं असता, त्या म्हणाल्या, "लोकशाही आहे. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं प्रत्येकाला कोणाला काय करायचा, याचा अधिकार दिलेला आहे. महायुती अंतर्गत काय लढाई सुरू आहे, ते त्यांनाच माहिती आहे, ते आम्ही वृत्तवाहिन्यांवर बघतो. पण मला त्यात पडायचं नाही. आमच्यासमोर देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार शेती प्रश्न मोठे आहेत. खूप आव्हानं आहेत. त्याकडे लक्ष देत नाही. खूप काम करायचं आहे, त्यांना काय भांडायचं, ते भांडू द्यात".

आरक्षणासाठी सर्वसमावेशक बिल आणा

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय असणार? आरक्षणाच्या मुद्यावर काय मुद्दे मांडणार? यावर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "गेली 10 वर्षे सातत्याने मराठा, धनगर, मु्स्लिम, लिंगायत, भटक्या समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार लोकसभेत बोलत आहे. सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसाहेबांच्या पक्षाने आरक्षणाची मागणी केंद्रात लावून धरली आहे. देशातील अनेक राज्यातील काही समाजाची, अशी परिस्थिती आहे की, त्यांना आरक्षणाची गरज आहे". यासाठी केंद्राकडे आम्ही सर्वसमावेशक बिल आला, त्यावर चर्चा होऊ द्या. पाच दिवस चर्चा करू. सगळ्यांचं एकमत करू आणि हा प्रश्न सोडवू. कोणाचंही राज्य असू,आरक्षण देईल, त्याच्या मागं आम्ही खंबीरपणे उभं राहू".

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com