
Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हयातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी तपास करून नऊ जणांना ताब्यात घेऊन मोक्का लावला आहे तर या प्रकरणांतील एक आरोपी फरार आहे. त्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर केले जाणारे आरोप थांबतील, असे वाटत होते. मात्र, काही केल्या विरोधकाकडून केले जात असलेले आरोप थांबण्याचे नाव घेत नाहीत. एका मुलाखतीवेळी मुंडेंवर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) चौफेर टीका केली. मला धनंजय मुंडेंचा राग पण येतो आणि कीव पण येते. काय होतास तू आणि काय झालास तू? कुणीकडे होता. राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी तुमच्याकडे दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला एवढा मान दिला होता. 2019 पर्यंत तुम्ही फार चांगले वागत होतात. 2019 नंतर तुम्ही कुणीकडचे कुणीकडे गेलात, अशा शब्दांत धस यांनी टीका केली.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आतापर्यंत तरी सुदैवाने अजून या हत्या प्रकरणात त्यांचा नंबर आलेला नाही. परंतु येत्या काळात या प्रकणाची सायबर क्राईमचे तज्ञ तपासणी करणार आहेत. तज्ञांची नियुक्ती सरकार करणार आहे. त्यावेळेस काही घडू नये, असे सुरेश धस (Suresh Dhas) यांनी म्हणत सूचक इशारा दिला आहे.
सायबर क्राईमचे तज्ञ सीडीआर तपासणार
दुसरीकडे यावेळी धस यांना संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आरोपी होतील का? असे विचारले असता धस म्हणाले, 'असे मला वाटत नाही. परंतु सायबर क्राईमचे तज्ञ सीडीआर तपासणार आहेत. दुर्दैवाने त्यात ते कुठे सापडू नयेत, एवढीच माझी प्रार्थना आहे. जर सापडले तर ते सरळसरळ आकाच्या शेजारी जातील, असे त्यांनी स्पष्ट केले .
लोकांनी सांगितलेले राजकारण्यांच्या डोक्यात लगेच बसते
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या घटनेत माझ्या पहिल्या दिवशी लक्षात आले की, घटना कशी घडली आहे. मी तिथे आजूबाजूच्या दहा गावात गेलो होतो. दहा गावातल्या लोकांना घटनेबाबत विचारले होते. संतोष देशमुख यांना मारेकर्यांनी बऱ्याच गावात नेऊन मारले. ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सगळ्यांनी वर्णन करून मला सांगितलं. लोकांनी सांगितलेले राजकारण्यांच्या डोक्यात लगेच बसले पाहिजे. त्यामुळे मी तसे वर्णन केले आणि तसेच वर्णन फोटोमध्ये दिसून आले, असे त्यांनी सांगितले.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.