
Mumbai, 09 March : संतोष देशमुख यांच्या हत्येचं मूळ कारण ठरलेल्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. मात्र, धनंजय मुंडे यांच्यावरील तो आरोप आता सुरेश धस यांनी थांबवला आहे. त्याचे कारणही आता पुढे आले आहे. खुद्द आमदार धस यांनीच एका मुलाखतीत त्याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे.
आमदार सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले, आवादा पवनचक्की खंडणीबाबत धनंजय मुंडे यांचा सरकारी बंगला असलेल्या सातपुड्यावर एक बैठक झाली होती, असा माझा आरोप होता. पण मी माझा आरोप आता थांबवलेला आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची बैठक झालेली नाही, असे दोन ते तीन दिवसांपूर्वी सांगितलं आहे. त्यामुळे मी त्यावर आता बोलत नाही.
सुरेश धस म्हणाले, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची चूक इथे झाली आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन आठवड्यापूर्वी म्हणाले होते की, माझ्यावर ज्यावेळी अशा प्रकारचे आरोप झाले होते, त्या वेळी मी नैतिकेच्या आधारे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडे यांनीच ठरवावे. आपला नेता आपल्याविषयी काय बोलतो, हे न ओळखण्याएवढे ते वेडे नाहीत.
मंत्रिपदावर थांबण्याचा वेडेपणा धनंजय मुंडे यांनी कशाला केला. अजितदादांच्या मनात आपण राजीनामा द्यावा, असे असेल तर पटकन अजितदादांकडे जाऊन राजीनामा द्यायला पाहिजे होता. तीन आठवड्यापूर्वी राजीनामा झाला असता तर एवढ्या रोषचे, रागाचे कारणीभूत धनंजय मुंडे ठरले नसते. सर्व रोष आणि राग हा वाल्मीक कराड याच्यावर गेला असता. तुम्ही राजीनामा न दिल्यामुळे या प्रकरणाचा रोष तुमच्यावर आला, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांच्यावर लोक कशी टीका करत आहेत, ते बघा. वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यामुळे मुंडे हे त्यांच्या पातळीवर जाऊन बसले आहेत. धनंजय मुंडे यांना अजूनही कोणी पूर्णपणे क्लिनचिट दिलेली नाही. अजूनही पुरवणी दोषारोपत्र दाखल व्हायचं बाकी आहे, असा इशाराही सुरेश धस यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं होतं ?
धनंजय मुंडे मंत्री असताना त्यांच्या सातपुडा या बंगल्यावर खंडणी प्रकरणासंदर्भात कोणतीही बैठक झाल्याचा पुरावा एसआयटीला मिळालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले. त्याचवेळी या चौकशीत कोणाचीही हस्तक्षेप होऊ दिलेला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.