Randeep Surjewala : 'महालक्ष्मी' योजनेसाठी महाविकास आघाडी पैसा कुठून आणणार? ; सुरजेवालांनी सांगितला 'तो' मार्ग !

Randeep Surjewala on Mahalakshmi Yojana : लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुती सरकारने काँग्रेसच्य योजना चोरल्या, असा आरोपही सुरजेवाला यांनी केला.
Randeep Surjewala
Randeep SurjewalaSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi News: महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचे प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे. मात्र यासाठी पैसा कुठूण आणणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर काँग्रसेचे राष्ट्रीय सचिव रणजितसिंह सुरजेवाला यांनी एक सोपा मार्ग सांगितला.

महायुती सरकार सर्वाधिक भ्रष्ट आहे. 40 टक्के कमिशन घेते असा त्यांचा आरोप आहे. फक्त भ्रष्टाचार कमी केला तरी लाडक्या बहिणीला देण्यास पैसे उपलब्ध होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने सुमारे सव्वा कोटी महिलांच्या खात्यात दोन हजार रुपये नियमितपणे जमा करीत आहे.

मोफत धान्य, शंभर युनिट मोफत वीज, महिलांना मोफत बस प्रवास दिले जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर महायुती सरकारने काँग्रेसच्या (Congress) योजना चोरल्या. त्या महाराष्ट्रात देऊ असे आता जाहीर केले आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने योजना जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रेवडी वाटप अशी खिल्ली उडवली होती. आता त्यांच्याच सरकारमार्फत भरमसाठ योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राल लाडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. आता मोदी यावर काही बोलत नाही याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले.

Randeep Surjewala
Election Commission Notice : ...म्हणून निवडणूक आयोगाने भाजप अन् काँग्रेस अध्यक्षांना पाठवली नोटीस !

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन होते. मात्र भाजप (BJP) सरकारच्या धोरणामुळे सर्वाधिक नुकसान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे होणार आहे. केंद्र सरकारने सोयाबीला 4892 हमी भाव जाहीर केला आहे. बाजारात तीन हजार रुपये क्विंटलने खरेदी सुरू आहे. याशिवाय उत्पादन झालेले पूर्ण सोयाबीनसुद्धा सरकार खरेदी करणार नाही.

Randeep Surjewala
Nagpur Congress: काँग्रेसच्या तीन बंडखोरांची युती अन् आघाडीला धास्ती; तिन्ही उमेदवारांचा प्रचार धडाक्यात सुरू!

दुसरीकडे सोयाबीन तेल आयात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सोयबीनचे भाव आणखी पडणार आहे. हे बघता चारही बाजूने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी केंद्र सरकारने केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव दिला जाईल असे सुरेजवाला यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com