Sushma Andhare Politics : आमदार परिणय फुके यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार आली नसल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते. मात्र, चाकणकर यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तुम्हाला काम करायचं नाही हे स्पष्ट आहे मात्र त्यासाठी खोट बोलू नका, असे म्हणत परिणय फुके यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची सात पानांचे पीडीएफ आपल्या फेसबूकवरून शेअर केले आहे.
परिणय फुके यांच्या दिवंगत लहान भावाच्या बायको प्रिया फुके यांनी फुके कुटुंबीयांकडून छळ होते असल्याचा आरोप केला होता. तसेच संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न तसेच आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचे प्रिया फुके यांनी म्हटले होते.
प्रिया फुके यांच्या आरोपानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडून आमदार परिणय फुके यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार आली नसल्याचे म्हटले होते. त्यावर सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'परिणय फुके यांच्या भावजयने महिला आयोगाकडे कुठलाही अर्ज केला नव्हता असे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले. मात्र 24 जून 2024 ला प्रिय फुके यांनी रीतसर सात पानी अर्ज केला होता. हे सहा दिवस आधी मी पत्रकार परिषदेतही सांगितले आहे आणि आत्ता त्याची इथे प्रत शेअर करत आहे.'
'तुम्हाला काम करायचं नाही हे स्पष्ट आहे मात्र त्यासाठी खोट बोलू नका. पीडित तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा सर्व मार्गांनी प्रयत्न करतात. सदरची पीडित ही दोन लहान मुलांची आई आहे. तिने आपल्याला टोल फ्री नंबर वर फोन करावा तर टोल फ्री नंबर आपले लागत नाही. नागपूरहून इथे येणं लहान मुलांना सोडून शक्य होत नाही. हा पत्रव्यवहार आपल्याला त्यांनी ई-मेल आणि पोस्टल दोन्ही पद्धतीने केलेला आहे.', असे देखील अंधारे यांनी चाकणकर यांनी उद्देशून म्हटले आहे.
प्रिया फुके यांनी महिला आयोगाला केलेल्या सात पानांचा अर्ज सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबूकवरून शेअर केला आहे. या अर्जामध्ये प्रिया फुके यांनी गैरअर्जदार/आरोपी म्हणून परिणय फुके यांचा उल्लेख केला आहे. तसेच अर्जामध्ये आपल्या पतीच्या नावे असलेले दुकान, प्लॅट हे नितीन फुके, परिणय यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे त्याची मागणी केली असता तुला जे करायचे ते करून घे, असे म्हणतात. असा उल्लेख आहे.
प्रिया फुके यांच्या सासू आणि आमदार परिणय फुके यांच्या आई रमा फुके यांनी सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांना आव्हान करताना म्हटले होते की, त्यांनी प्रिया फुके यांचे म्हणणे ऐकूण घेतले. तिच्यावर विश्वास ठेवून माध्यमांना माहिती दिली. मी सुद्धा एक महिला आणि आई आहे. माझा कुटुंबावर आरोप करण्यापूर्वी माझीही बाजू समजून घेतली असती, चर्चा केली असती तर तुम्हाला खरी वस्तुस्थिती कळली असती आणि डोळेसुद्धा उघडले असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.