Suresh Jain Sanjay Raut Meet : राजकीय अज्ञातवास संपतोय का? राऊत–जैन भेटीनं चर्चांना उधाण

Suresh Jain–Sanjay Raut Secret Meeting : What Happened? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फायदा करुन घेण्यासाठी राऊतांनी जैन यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Suresh Jain Sanjay Raut meet
Suresh Jain Sanjay Raut meet, Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon political news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान राजकीय अज्ञातवासात असलेले जेष्ठ नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहाता या भेटीला मोठे महत्व असून या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. या भेटीमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संजय राऊत हे दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर असून ते काल सकाळी जळगाव विमानतळावर दाखल झाले. तिथेच विमानतळावरील प्रतीक्षा कक्षात सुरेशदादा जैन आणि राऊत यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फायदा करुन घेण्यासाठी राऊतांनी जैन यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच सुरेश जैन हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बाहेर पडले होते. त्याचा फटका पक्षाला बसला होता. मात्र ते अन्य कुठल्याही पक्षात गेले नाहीत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहता, सुरेशदादा जैन यांचा मोठा प्रभाव असून त्यांच्याभोवती मोठा समर्थक वर्ग आहे. तब्बल ३५ वर्ष त्यांचे जळगाव पालिकेवर वर्चस्व होते. त्यामुळे पालिका निवडणुकीत जैन यांची साथ मिळाल्यास ठाकरे गटाला मोठा फायदा होऊ शकतो.

Suresh Jain Sanjay Raut meet
Dhule Crime : सैन्य दलातील जवान पतीनं पत्नीला इंजेक्शन देऊन मारलं, धुळ्यात धक्कादायक घडलं...

दरम्यान जैन यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, सुरेश जैन हे आमचे जुने मित्र आहेत. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र राजकीय विषयावर चर्चा झाली नाही. सुरेश दादा आमचे नेते व मार्गदर्शक आहेत. सुरेशदादा जैन अजून थकलेले नाहीत असं राऊत म्हणाले. दरम्यान, आपण राजकारणात पुन्हा सक्रीय होणार नसल्याची प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी दिली आहे.

साडे चार वर्ष होते कारागृहात

सुरेश जैन १९७४ पासून ४० वर्षे राजकारणात होते. १९८० पासून राजकारणात प्रवेश केल्यानंतर ३४ वर्षे ते आमदार होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रिपद दिलं. तत्कालीन जळगाव महापालिकेच्या घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन यांना साडेचार वर्षे कारागृहात राहावे लागले. कारागृहातून बाहेर आल्यावर प्रकृतीच्या कारणास्तव ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडले. त्यांनी ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Suresh Jain Sanjay Raut meet
Dhule Cash Controversy : 'धुळे कॅश' प्रकरणात आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएच्या अडचणी वाढल्या, पोलिस अधिक्षकांना अहवाल सादर होताच मोठी कारवाई

त्याचवेळी शिवसेनेमुळे मी मोठा झालो, बाळासाहेब ठाकरेंनी मला मंत्री केलं त्याबद्दल आपण ऋणी असून प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याचं सांगितलं होतं. तसेच अन्य कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com