Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणी वाढ? 'त्या गाण्या'वर टी-सीरिजचा स्ट्राइक; कामराकडूनही पलटवार

T-Series Copyright On Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. त्याला दुसरा समन्स पोलिसांनी बजावला असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Kunal Kamra
Kunal KamraSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने केलं होतं. त्यानंतर त्याला दिसेल तेथे चोप देवू अशी धमकी शिवसैनिकांनी देताना जेथे कार्यक्रम झाला त्याची तोडफोड केली. यानंतर त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना खार पोलिसांनी दिल्या आहेत. यासाठी त्याला दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. दरम्यान आता ज्या गाण्यावरून हा वाद झाला त्याच्या कॉपीराइटवरून टी सीरिजने कामरावर स्ट्राइक केला आहे. यामुळे त्याच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. पण यावरूनही माघार न घेता कुणाल कामराने टी-सीरिजला उत्तर दिलं आहे. ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं म्हटल्याने राज्यभर शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. याप्रकरणी मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओ देखील शिवसैनिकांनी फोडला. तसेच त्याला समोर येऊन बोल... माफी माग अन्यथा तुझा महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही. आणि घेऊही देणार नाही असा इशारा दिला होता. या इशाऱ्यावर कामराने उत्तर देताना आपण झूंडशाहीला घाबरणारे नसून कॉट खाली बसून सर्व पाहणाऱ्यातला नसल्याचे सांगत माफी मागणार नसल्याचे म्हटले होते. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर आता दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आलाय.

अशावेळी कामराच्या अडचणीत भर पडणारी घटना घडली असून 1987 चा चित्रपट मिस्टर इंडिया चित्रपटातील हवा हवाई गाण्याच्या पॅरोडीवरून टी-सीरिजने कॉपीराइट टाकला आहे. यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या चित्रपटाचे मालकी हक्क टी-सीरिजकडे आहेत. यावेळी टी-सीरिजच्या प्रवक्ताने, कुणाल कामराने गाण्याचा वापर करण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. त्याने अधिकारांचे उल्लंघन केलं आहे. यामुळे त्याचा व्हिडिओ ब्लॉक करण्यात येत असल्याचा दावा केलाय.

Kunal Kamra
Kunal Kamra : शिवसेनेच्या मंत्र्यांनं घेतली कुणाल कामराच्या संरक्षणाची ग्वाही; म्हणाले, 'त्याची मानसिक स्थिती...'

दरम्यान माघार घेईन तो कामरा कसला त्याने टी-सीरिजला जबरदस्त प्रतिक्रिया देताना, 'नया भारत' या त्याच्या व्हिडिओला कॉपीराइट उल्लंघन केल्याचं सांगत यूट्यूबवर ब्लॉक केल्याचं सुनावलं आहे. त्यांच्या अशा वर्तनामुळे प्रेक्षक हे गाणं पाहू शकत नाहीत. या कॉपीराइटच्या कारणामुळे व्हिडिओचं मानधनही त्याला मिळणार नसल्याचे त्याने म्हटलं आहे. याबाबत कामराने युट्यूबवर स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

आपल्या या स्क्रीनशॉटमध्ये कामरानं नमस्ते @TSeries, कुणाच्या इशाऱ्यावर बाहुल्याप्रमाणे वागू नका. विडंबन आणि व्यंगचित्र कायदेशीर आहेत. ते वाजवी वापराच्या अंतर्गत येतात. मी गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेले नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ हटवलं तर कव्हर गीत/नृत्याचे व्हिडिओ हटवावे लागतील. मेकर्स प्लीज याकडे लक्ष द्या, असेही आवाहन त्याने केलं आहे. तर भारतात प्रत्येक एकाधिकार माफियापेक्षा कमी नाही. त्यामुळे माझा व्हिडिओ हटविण्यापूर्वी हा विशेष कार्यक्रम पाहा आणि डाऊनलोड करा. टी-सीरिज तुमच्या माहितीसाठी मी तामिळनाडूमध्ये राहतो, असेही त्याने म्हटलं आहे.

Kunal Kamra
Kunal Kamra Politics: कुणाल कामरा विरोधात मुंबई बाहेर, नांदगावला पहिला गुन्हा दाखल!

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधल्याचेही समोर आले आहे. त्याने बुधवारी (ता.26) आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो एका गाण्याच्या माध्यमातून सीताराम यांना 'निर्मला ताई' म्हणत असून त्यांच्या धोरणांवर बोट ठेवत आहे. यात तो, ''आपका टैक्स का पैसा हो रहा है हवा हवाई। असे म्हणत आहे. याच गाण्यावरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर टी-सीरिजने कॉपीराईटचा स्ट्राइक केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com