Indapur News : इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ल्यामुळे (Indapur Crime) खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. यावरून सुप्रिया सुळे यांनी मागचे-पुढचे सर्व काढत, भाजप नेते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच थेट आव्हान दिल्याचे दिसते. 'गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा', असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. यावरून त्यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना टॅग केले आहे. गुन्हेगारांना राज्यात कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे, हे सांगण्यासाठी अशी उदाहरणे पुरेशी आहे, असे म्हणत सुप्रिया यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गृहविभागाच्या (Home Department) कारभारावर निशाणा साधला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाल्यानतंर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संपर्क केला. विचारपूस केली. हल्लेखोरांचा हा भ्याड पूर्वनियोजित होता, असे दिसते. विशेष म्हणजे हा हल्ला तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी चालकाच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली. हे अतिशय भंयकर आणि गंभीर आहे. या सर्व घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन कार्यवाही करण्याची गरज आहे. Supriya Sule notices the attack on Indapur Tehsildar Shrikant Patil
या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुण्यात (Pune) 'हिट अॅड रन' प्रकरणावरून देखील गृहमंत्र्यांना चिमटा काढला आहे. गृहमंत्री महोदय आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामिनावर सुटतात. या घटनेचा निषेध, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे. लोकसभेची निवडणुकीवेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर आलेला ताण आणि निवडणुकीनंतर राज्यात सुरू झालेल्या घटनांमुळे गृहखाते (Home Department) घेरले गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.