Tanaji Sawant
Tanaji Sawantsarkarnama

Tanaji Sawant VS NCP : 'मला वाटतं ते बोलतो, राष्ट्रवादीच्या औलादी...', तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; महायुतीमध्ये फूट?

Tanaji Sawant Controversial Statement : तानाजी सावंत यांनी महायुतीमधील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वादग्रस्त विधान केले आहे. आपल्याला जे वाटतं ते आपण बोलतो असे देखील ते म्हणाले.
Published on

Tanaji Sawant News : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत धारशिव जिल्ह्यात स्वबळाचा नारा देताना माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, '2022 ला सत्तांतर केल्यानंतर मी एकमेव युतीतील आमदार आहे जो बोलत होतो ही परिस्थिती राहणार नाही. कारण, राष्ट्रवादीची औलाद अशी आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर जसं होतं तसं त्यांच होतं. वर्षाच्या आतच ते खरं ठरलं'

'त्यावेळी मी हे देखील सांगत होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. वेगवेगळ्या नाहीत. याचा प्रत्यय तुम्हाला मागील दहा पंधरा दिवसात आला असेल. कोणाला पटो ना पटो माझी जी मतं आहेत ती आहेत.', असे देखील ते म्हणाले.

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. महायुतीचा घटक आहे. मात्र, त्यांना सोबत घेतलं हे आपल्याला मान्य नसल्याचेही सावंत यांनी सांगित भाजपर देखील नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले, ' येवढा अट्टाहास कशासाठी? हिंदुत्व स्वीकारलं का त्यांनी? ज्या पद्धतीने ते आपल्या मांडली मांडी लावून बसतात. पण आपली तत्व, युतीची ध्येय धोरणं, त्यांना मान्य आहेत का? मग कशासाठी आमच्या बोडक्यावर त्यांना लादताय.'

Tanaji Sawant
farmer loan waiver controversy : नाव राधाकृष्ण, कृत्य कंसाची! औलादीचं वाहन फोडणाऱ्याला बक्षीस; मंत्री विखेंवर बच्चू कडूंचा 'प्रहार'

गरज नसताना त्यांना घेतलंय हे आम्हाला मान्य नाही, असे म्हणत ते पुढे म्हणाले की, त्यांना वाटतं होतं की सावंत आता येणार नाही. त्यामुळे सगळं आपण धुऊन घेऊ. पण ज्या कार्यकर्त्यांनी मी मैदानात उतरणार. आपण आपल्या किल्ले शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करू.

सावंत यांचा एकला चलोचा नारा...

सावंत यांनी घाबरण्याचं कारण नाही. आपला अजेंडा विकासाचा आहे असे सांगत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. एकी आणि आपला अजेंडा घेऊन जायचं, असे ते म्हणाले. तसेच परंड्यात 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद शिवसेना स्वबळावरच लढणार असे ते म्हणाले.

Tanaji Sawant
नगराध्यक्ष पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवार जाहीर करताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही दंड थोपाटले, माजी नगराध्यक्ष पत्नीसाठी आग्रही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com