Pavitra Portal TET : शिक्षकांना नियुक्ती नाकारल्यास शिक्षण संस्थांना बसणार जोरदार दणका; सरकारने घेतला मोठा निर्णय

Teacher appointment denial : काहीवेळा मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत.
Teacher recruitment
Teacher recruitmentSarkarnama
Published on
Updated on

Teachers Recruitment : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करताना काही शिक्षण संस्थांकडून होत असलेल्या अडवणुकीचा फटका अनेक भावी शिक्षकांना बसत आहे. पवित्र पोर्टलमार्फत निवड होऊनही शिक्षकांना नियुक्ती नाकारल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्याविरोधात शिक्षण विभागाने आता कडक पावले उचलली असून अशा शिक्षण संस्थांवर जरब बसविण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

शिक्षण विभागाने आज एका शासन निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेतील काही तरतुदींमध्ये बदल केला आहे. शासन निर्णयात म्हटले आहे की, मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत.

हे प्रकार रोखण्यासाठी मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यांतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षणाधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित पद शैक्षणिक वर्षासाठी व्यपगत करण्याची कार्यवाही करावी, अशी नवी सुधारणा करण्यात आली आहे.

Teacher recruitment
Teachers Recruitment : ... तर नव्याने TET द्यावी लागणार! शिक्षक भरतीबाबत मोठी बातमी, वय, प्राधान्यक्रमांच्या तरतुदींमध्ये बदल

काहीवेळा मुलाखतीसह निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवारांची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत. परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहत आहेत. काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास आले आहेत. आता या प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आली आहे.

मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकास तीन या प्रमाणात उदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार उमेदवारांनी देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त तीन प्राधान्यक्रमावर शिफारस होईल. त्याचप्रमाणे एखाद्या संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनंकापासून ४५ दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.

Teacher recruitment
Shiv Sena Supreme Court : शिंदेंची धाकधूक वाढली, महापौर निवडीआधी सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा फैसला? असीम सरोदेंनी सांगितलं काय होणार?

वरीलप्रमाणे निवड प्रक्रिया राबविल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे, त्या पदांचा गट, विषय, आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदविणे आवश्यक राहील. अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही, अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टलमार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com