Tehsildar Suspended : तहसीलदार, नायब तहसीलदार जागेवर निलंबित; शेतकऱ्याच्या जमीन प्रकरणातील 'तो' आदेश भोवला!

Tehsildar Rajesh Bhandarkar Court : जमीन नावावर करण्याचे आदेश असतानाही त्याकडे तहसीलदार दुर्लक्ष करत होते. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालायता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याची दखल न्यायलायने घेतली आहे.
Tehsildar Rajesh Bhandarkar  Suspended
Tehsildar Rajesh Bhandarkar Suspendedsarkarnama
Published on
Updated on

Tehsildar News : शेतकऱ्याचे आणि त्याचे वारसाचे नाव गाव नमुना सातमध्ये नोंदवण्याचे न्यायालयाचे आदेश होते. मात्र, हे आदेश असताना देखील तहसीलदार आणि नायब तहसीलदाराने हे प्रकरण निकाली न काढता मालकी हक्काबाबत वाद आहे, असा ठपका ठेवल्याने न्यायालय आणि वन विभागाने मोठे पावले उचलत नागपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्याचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचे निलंबन करण्याचे निर्देश दिले.महसूल विभागाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी तत्काळ भांडारकर आणि खांडरे यांचे निलंबन केले.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी परमेश्वर मेश्राम यांचे नाव नोंदवण्याचे आदेश असताना देखील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी कारवाई केली नाही. त्यामुळे निराश झालेल्या मेश्राम यांनी तहसील कार्यालयात विष प्रशासन आत्महत्या करण्याचा प्रयत्न 26 सप्टेंबरला केला. सुदैवाने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्या जीवाचा धोका टळला.

न्यायलयाच्या आदेशाची अंमलबजवाणी होत नसल्याची दखल न्यायालयाने घेत तत्काळ महसूल अधिनियम १९६६ आणि नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका भांडाकर, खांडरे या अधिकाऱ्यांवर ठेवत कारवाई निर्देश देत तत्काळ निलंबित करण्यास सांगितले. मेश्राम यांनी विष प्राशन केल्याने जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी देखील तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.

Tehsildar Rajesh Bhandarkar  Suspended
Vanjari community reservation dispute : शरद पवारांचा शिलेदार संतापला; म्हणाला, वंजारी समाजाचे आरक्षण कमी करा, म्हणणारे जरांगे कोण?

मुख्यालय सोडता येणार नाही...

अवर सचिव प्रवीण पाटील यांनी केलेल्या निलंबनाच्या आदेशात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भांडरकर आणि खांडरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच निलंबनाच्या कालवधीत खासगी नोकरी, व्यवसाय करता येणार नाही केल्यास निलंबन भत्ता रद्द करण्यात येईल.

Tehsildar Rajesh Bhandarkar  Suspended
Ajit Pawar : 'पक्ष न पाहता...', मुस्लिम शिष्टमंडळाने भेट घेताच नगरमधील 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळी प्रकरणी अजितदादांचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com