Raj-uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट: उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले,'निवडणुकाजवळ आल्यानंतर...'

Thackeray brothers alliance News : मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेली मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची राजकीय युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackrey & Raj Thackerey
Uddhav Thackrey & Raj ThackereySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात राज व उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा घेऊन 15 दिवस झाले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेली मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची राजकीय युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इगतपुरी येथील मनसेच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे युतीबाबत काही बोलणार का? याकडे लक्ष लागले होते. मात्र, ते काहीच बोलले नाहीत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी केली जाणार अशी विचारणा पत्रकाराकडून यावेळी करण्यात आली होती. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'सध्या आम्ही दोघेजणही मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आलो आहोत. त्यामुळे सध्या आम्ही एकच आहोत. आम्ही दोघांनीही मेळाव्यात तशी घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाजवळ आल्यानंतर आमच्यात राजकीय युतीबाबत बोलणी सुरु होईल,' असे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीबाबतची भूमिका स्पष्ट केली.

Uddhav Thackrey & Raj Thackerey
BJP News : …तर भाजप येत्या लोकसभा निवडणुकीत 150 जागाही जिंकणार नाही; पीएम मोदींचे नाव घेत बड्या नेत्याने केला दावा

हिंदी सक्तीबाबत मी कोणतेही अंमलबाजवणी केली नव्हती. माशेलकर अहवाल सादर केला पण स्वीकारलेला नाही. त्यामुळे कोणत्याही राज्यात कोणत्याही भाषेची सक्ती लागू होऊ देणार नाही. त्यासोबतच राज्यात हिंदी भाषेची सक्ती करू देणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेवेळी केली.

Uddhav Thackrey & Raj Thackerey
MNS Shivsena UBT Alliance : ठाकरेंच्या एकीची विरोधकांना धास्ती, पण राज यांची उद्धव ठाकरेंना टाळी द्यायला टाळाटाळ

विधानभवनातील मारहाणीच्या घटनेवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंनी सत्तेचे माजकारण सुरू असल्याची टीका सरकारवर केली. राज्यात जे घडतंय त्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घेतलीच पाहिजे. राज्यातील समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. लोकशाहीचा खून करणारे विधिमंडळात वावरत आहेत. सत्तेच्या लालसेपोटी राजकारण्यांनी गुंडांना पक्षात घेतले, अशी टीका ठाकरेंनी केली.

Uddhav Thackrey & Raj Thackerey
Islampur name change : इस्लामपूरचे नाव बदलणार; पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा: केंद्र सरकारकडे पाठवला प्रस्ताव

दरम्यान, इगतपुरी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे (Raj thackeray) युतीबाबत काही बोलणार का? याकडे लक्ष लागले होते. मात्र, ते काहीच बोलले नाहीत. तर शुक्रवारी सायंकाळी राज ठाकरे यांची सभा मीरा- भाईंदर येथे होणार आहे. त्या सभेवेळी ते युतीबाबत काही वक्तव्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackrey & Raj Thackerey
Congress strategy change : काँग्रेसच्या रणनीतीत मोठा बदल; भाजपला जड जाणार ! स्थानिकच्या निवडणुकीपूर्वीच खास प्लॅन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com