Congress strategy change : काँग्रेसच्या रणनीतीत मोठा बदल; भाजपला जड जाणार ! स्थानिकच्या निवडणुकीपूर्वीच खास प्लॅन

Congress new election planNews : काँग्रेसने त्यांच्या रणनीतीत मोठा बदल करीत आता भाजपप्रमाणेच बूथ कमिटीवरील नेमणुकीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या माध्यमातूनच आगामी काळात होत असलेली निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे.
Congress Party Transformation
Congress Party TransformationSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या काँग्रेसकडून आता सावधपणे पावले उचलली जात आहेत. आगामी काळात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्याची तयारी आतापासूनच केली जात आहे. ही निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वबळावर लढणार याची उत्सुकता लागली आहे.

त्यातच आता येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ताकही फुंकून पिले जात असून काँग्रेसने त्यांच्या रणनीतीत मोठा बदल करीत आता भाजपप्रमाणेच बूथ कमिटीवरील नेमणुकीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या माध्यमातूनच आगामी काळात होत असलेली निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे.

भाजपने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बूथ कमिटी निवडीवर भर दिला होता. त्याचा भाजपला मोठा फायदा झाला. त्यामुळेच ग्रामीण भागापासून प्रत्येक बुथवर कार्यकर्त्याची नेमणूक करीत जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे बूथ लेव्हलची भाजपची यंत्रणा इतर पक्षाच्या तुलनेत ताकदवान ठरली आहे. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाला आहे.

Congress Party Transformation
Shivsena UBT : दोन जिल्हाप्रमुख एकमेकांचे तोंडही बघत नाहीत; एकच जिल्हाप्रमुख नेमा : ठाकरेंच्या शिवसेनेत खदखद

त्यासोबतच भाजपने (Bjp) नुकतीच सदस्य नोंदणीचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याच वेळी बूथ लेव्हलची यंत्रणा नेमली आहे. त्या माध्यमातून भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत होणार आहे. विशेषतः बूथ लेव्हल पासून ते मंडल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष अशा सर्व निवडी करीत संघटनात्मक निवडणुका पूर्ण करीत बाजी मारली आहे.

Congress Party Transformation
BJP News : …तर भाजप येत्या लोकसभा निवडणुकीत 150 जागाही जिंकणार नाही; पीएम मोदींचे नाव घेत बड्या नेत्याने केला दावा

त्याचमुळे येत्या काळात काँग्रेसनेदेखील भाजपच्या पावलावर पावले ठेवत बूथ लेव्हलपासून नियुक्ती करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्याचे परिणाम येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून होणार आहे. त्यामुळे बूथरचनेवर भर देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. गेल्या काही दिवसापासूनच काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. या सर्व यंत्रणेवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Congress Party Transformation
NCP Politics : राजकीय मतभेदानंतर अनेक वर्षांनी उंडाळकर बंधू आले एका व्यासपिठावर : कारण काय वाचा...

युवकांचा सहभाग

आगामी काळात होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने (Congress) रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आता युवक काँग्रेस, एनएसयुआय यांना बूथ कमिटीमध्ये सक्रिय सहभाग देण्यात येणार आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या सर्व कामात मोठ्या प्रमाणात युवकाचा सहभाग असणार आहे.

Congress Party Transformation
Congress Politics : जनसुरक्षा विधेयक पास झाल्याने काँग्रेस हायकमांड नाराज, विजय वडेट्टीवारांविरोधात थेट नोटीसच धाडली

भाजपप्रमाणेच करणार 'मायक्रो मॅनेजमेंट':

येत्या काळात काँग्रेसकडून प्रत्येक बूथवर खास कमिटी नियुक्त करण्यात येणार आहे. या कमिटीमध्ये स्थानिक कार्यकर्ते, महिला, युवक, आणि समाजातील विविध घटकांचा समावेश असणार आहे. भाजपमध्ये प्रत्येक बूथवर मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचे नियोजन करण्यात येते, त्याचप्रमाणे काँग्रेसही बूथ पातळीवर संपर्क वाढविणार आहे.

Congress Party Transformation
BJP Politics : भाजपची रणनिती ठरली ! निवडणुकीआधी मुख्यमंत्री फडणवीस आख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार

डिजिटल ट्रेनिंग आणि प्रशिक्षण सत्र

काँग्रेसने येत्या काळात बूथ कमिटी सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र, डिजिटल साधनांचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्यासोबतच मतदारांशी नियमित संवाद ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. विशेषतः भाजपची ताकद असलेल्या भागावर व मतदारसंघ काँग्रेस टार्गेट करणार असून, तेथे बूथ स्तरावर मजबूत कमिट्या उभ्या करण्यात येणार आहेत.

Congress Party Transformation
NCP Politics : 'थोरल्या' साहेबांनी रोहित पवार, राजेश टोपे अन् आव्हाडांना का डावललं? काय आहेत गणितं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com