Ayodhya Poul : 'वर्षा'वर जाण्याचे कारण ठाकरेंच्या वाघिणीने सांगूनच टाकलं, फोटो दाखवत पुरावेही दिले

Ayodhya Poul CM Eknath Shinde Shivsena : उद्धव साहेबांचे सरकार आल्या आल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी केली. मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे, असा आरोप अयोध्या पौळ यांनी एकनाथ शिंदे सरकारवर केला.
Ayodhya Poul
Ayodhya Poul sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Poul News : सोशल मीडियातून एकनाथ शिंदे गटावर टीकेच्या बाण सोडणाऱ्या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या, ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीची आरती करत असलेल्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. ठाकरे गटाची साथ सोडून पौळ शिंदे साथ देणार का? याची चर्चा देखील सुरू झाली होती. शिंदेंच्या काही नेत्यांकडून अयोध्या पौळ यांना ट्रोल देखील केले जात होते.

या सगळ्यावर अयोध्या पौळ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिंदे गटाला प्रत्युत्तर देत 'वर्षा' बंगल्यावर जाण्याचे आणि गणपतीची आरती करण्याचे कारण सांगून टाकले.

अयोध्या पौळ म्हणाल्या, मी वर्षावर जात आहे. हे मी उद्धवसाहेबांना सांगितले होते. पावसाने जे शेतकऱ्यांच्या नुकसान झाले त्या संदर्भात मी काही व्हिडिओ केले होते. त्यानंतर मला 'वर्षा'वरून फोन आला. तुमच्यासोबत किती शेतकरी आहेत याची विचारणा त्यांनी केली. मी वर्षावर गेल्या गेल्या एकु मामाच्या माणसांची स्ट्रेट्रजी होती ते म्हणाले ताई आरती करू.

Ayodhya Poul
Sanket Bawankule : संकेत बावनकुळेची ऑडीकार चालवणाऱ्या अर्जुनचे काँग्रेसशी 'कनेक्शन'

मी माळकरी, हिंदुधर्मातून आलेली आहे. मी दुसऱ्या धर्माचा व्देष करत नाही. प्रसादाला नाही म्हणत नाही. त्या प्रमाणे आरतीला देखील नाही म्हणत नाहीत. गेल्या गेल्या शेतकऱ्यांच्या आणि माझ्या हातात आरतीचे ताट दिले.वर्षा बंगला काही शिंदेंच्या नावावर केला आहे का? तो शासनाचा बंगला आहे. तसा गणपतीबाप्पा एकट्या एकनाथ शिंदेंचा आहे का? तो सर्वांचा आहे. त्यांची आरती केली. ऐकु मामाचे ट्रोल आर्मी म्हणते की आरतीचा मान दिला, असे पौळ म्हणाल्या.

पौळ ठाकरेंच्या सोबतच

उद्धवसाहेबांचे सरकार आल्या आल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी केली. मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे. शिवसैनिकांना, भाजपच्या आयटी सेलला, एकनाथ शिंदेंच्या आयटी सेलला तसेच एकनाथ शिंदेंना हेच सांगते मी उद्धवसाहेबांना सोडून कुठेही जाणार नाही.

अयोध्या पौळ यांनी फोटो दाखवले

अयोध्या पौळ यांनी गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले फोटो दाखवले. हे नुकसान झाले होते तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तासाच्या आत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांचे अजुनही 24 तास झाले नाहीत, असे अयोध्या पौळ म्हणाल्या.

Ayodhya Poul
Chhagan Bhujbal Politics: शरद पवारांचे विश्वासू श्रीराम शेटे भुजबळांच्या भेटीला... बंद दाराआड झाली चर्चा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com