Shivsena UBT News : वाईन शाॅप भुमरेंचा पिच्छा सोडेना ; ठाकरे गटाची लोकायुक्त, मोदी, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार..

complaint against Shiv Sena MP Sandipan Bhumre : शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत संदीपान भुमरे यांच्यावर त्यांनी मंत्री पदाचा गैरवापर करत पत्नी, सुनेच्या नावावर वाईन शाॅपचे लायसन्स मिळवल्याचा आरोप केला.
MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta GordeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी राज्यात रोजगार हमी व फलोत्पादन तथा पालकमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत पत्नी, सूनेच्या नावावर पाच वाॅईन शाॅप घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी केला आहे. यात मनीलाॅड्रींगचा प्रकार घडल्याचा दावा करतानाच खासदार संदीपान भुमरे यांची चौकशी करावी, असी मागणी थेट राज्याचे लोकायुक्त, देशाचे पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून संदीपान भुमरे यांच्यावर त्यांनी संभाजीनगर, पुणे शहरात अनेक वाईन शाॅप सुरू केल्याचा आरोप करत दारुवाला पाहिजे का? असा प्रचाराचा मुद्दा केला होता. संदीपान भुमरे लोकसभेच्या संभाजीनगर मतदारसंघातून सव्वा लाखाच्या वर मताधिक्य घेऊन विजयी झाले. पण वाईन शाॅपचे आरोप त्यांचा पिच्छा काही सोडत नाहीये.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत संदीपान भुमरे यांनी आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करत कशा प्रकारे पत्नी, सुनेच्या नावावर वाईन शाॅपचे लायसन्स मिळवले, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनीलाॅन्ड्रींग केल्याचा पुराव्यासह आरोप केला. माजी मंत्री आणि खासदार संदीपान भुमरे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करुन दबाव तंत्राचा वापर करीत भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आचारसंहितेचा भंग केला.

MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
Sandipan Bhumre : संदिपान भूमरेंचं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज; म्हणाले, "तुम्ही फक्त उमेदवारी..."

पत्नी आणि सुनेच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्चून पाच वॉईन शॉपचे लायसन्स मिळविले. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात 2 कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले. (Chhatrapati Sambhajinagar) त्यांनी एवढी कोट्यवधीची रक्कम कुठून आणली, याचा तपास करून त्यांच्यावर मनीलॉड्रींगचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार राज्याचे लोकायुक्त यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे गोर्डे यांनी केली.

मंत्री होताच संदीपान भूमरे यांनी सरकारी दारूचे वाईन शॉप लायसन्स घेण्यास सुरूवात केली. हे परवाने त्यांनी पत्नी आणि सुनेच्या नावावर घेतले. मंत्री किंवा आमदार, खासदार यांना त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर सरकारी लायसन्स घेता येत नाही. मात्र भूमरे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर आणि दबाव वापरून पत्नी पुष्पाबाई यांच्या नावावर जालना आणि जळगाव या दोन ठिकाणी, सुन वर्षा विलास भूमरे हिच्या नावावर वाळूज, पूणे, जळगाव या तीन ठिकाणी वाईन शॉपचे लायसन्स खरेदी केले आहे.

MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
BJP Vs Shivsena : देवेंद्र फडणवीसांना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले...

एका वॉईन शॉप परवान्यासाठी बाजारभावानूसार त्यावेळी 6 ते 7 कोटी रुपये लागायचे. प्रत्येक वॉईन शॉपला स्वत:च्या नावावर करण्याकरिता शासनाची 1 कोटी रुपये फीस भरावी लागते. भूमरे (Sandipan Bhumre) यांनी मंत्रीपदावर असताना कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केला, असा आरोप गोर्डे यांनी केला. 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना भुमरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात 2020 ते 2023-24 या आर्थिक वर्षातील पती-पत्नीचे एकूण उत्पन्न 2 कोटी 7 लाख 1 हजार 662 रूपये इतके दाखवले आहे. मागील दहा वर्षातील त्यांचे उत्पन्न हे 2 कोटी 64 लाख 95 हजार 763 रूपये असल्याचा दावाही गोर्डे यांनी केला.

प्लाॅट, जमीन खरेदी..

भूमरे यांनी मंत्रीपदावर असताना वळदगाव (ता.जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गटनंबर 144 मध्ये एक प्लॉट 1 कोटी 96 लाख 49 हजार 250 रुपयाला 7 जुलै 2022 रोजी खरेदी केला. तर पैठण शहरात गटनंबर 127/2 ही जमीन 14 जुलै 2023 रोजी 1 कोटी 6 लाख 80 हजार रुपयात खरेदी केली. याशिवाय खासदार भूमरे यांनी पत्नी पुष्पाबाई यांच्या नावे दोन वाईन शॉपचे परवाने खरेदी केले.

MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
Chandrakant Khaire News : मी मंदिरे उभारली, दारुची दुकाने नाही ; खैरेंचा प्रचार सुरू..

त्याचे शासकीय हस्तातरण, नाव बदलणे यासाठीचे चलन दोन कोटी रुपये एवढे आहे. या शिवाय जागेची किमंत वेगळी असून असा एकूण खरेदीचा खर्च हा 5 कोटीपेक्षा जास्त जातो, असा दावा दत्ता गोर्डे यांनी केला. त्यांचे उत्पन्न कमी असतानाही त्यांनी हा पैसा कुठून व कशा पद्धतीने आणला, याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मनीलॉड्रींगचा अपराध केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशी मागणी गोर्डे यांनी केली.

तसेच भुमरे यांचे चिरंजीव विलास भूमरे 2014 मध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाच्या निवडणूकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 2013-14 चे एकूण उत्पन्न 5 लाख 72 हजार 610 रूपये दाखविण्यात आले आहे. विधानसभा 2019 च्या निवडणूकीत विलास भूमरे यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांचे उत्पन्न 2014 ते 2019 पर्यंत 49 लाख 96 हजार 55 रुपये दाखवले आहे. त्यांचे एकूण उत्पन्न 55 लाख 68 हजार 665 आहे.

MP Sandipan Bhumre-Vilas Bhumre-Datta Gorde
Sandipan Bhumre : संदिपान भूमरेंचं चंद्रकांत खैरेंना ओपन चॅलेंज; म्हणाले, "तुम्ही फक्त उमेदवारी..."

तरी त्यांनी मागील चार वर्षात स्वत: पत्नी वर्षाच्या नावाने तीन वाईन शॉपचे परवाने खरेदी केले आहेत. हा मोठा भ्रष्टाचार असून त्यांचे उत्पन्न कमी असताना त्यांनी शासनाच्या वाईन शॉप खरेदीसाठी 3 कोटी रुपये आणले कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विलास भूमरे यांची पत्नी शिक्षिका पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांनी २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचे उत्पन्न निरंक दाखवले. भूमरे यांनी मंत्रीपदाच्या कार्यकाळात पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गोर्डे यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com