Mumbai News : मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याने ओबीसी समाजात नाराजी असल्याची भावना व्यक्त होता असताना याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले असून भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. गरज पडल्यास याबाबत मी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यास तयार आहे.
ओबीसी समाजात कसलीच नाराजी नाही. नाराजी असली तर भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांना देखील दिली असल्याचे स्पष्ट करीत भाजप ओबीसी समाजाच्या सदैव पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या निर्णयामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांना कायदेशीर पद्धतीने प्रमाणपत्र देणे आवश्यकच होते. परंतु, मिळत नव्हते, जो अधिकार होता. तो अधिकार आता सोप्या पद्धतीत केला आहे. या निर्णयात कोणालाही वाटेकरी न करता ओबीसी समाजाला 100 टक्के संरक्षण देऊन, मराठा समाजाला आरक्षण दिले आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, तुम्ही काहीही केले तरी टीका होतच असते. लोक टीका करीत असतात. अर्धे लोक इकडे टीका करतात, अर्धे लोक तिकडे टीका करतात. परंतु, आपल्याला महाराष्ट्रातील सगळ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. मराठा, ओबीसी, धनगर या सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारची आहे.