
Dharashiv News : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण तापले असतानाच दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या जीवघेण्या हल्ल्याने गावासह परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. येथील नागरिकांनी आठ दिवसापासून आंदोलनही केले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केला असता, आता धाराशिवमधील सरपंच हल्ला प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून गुरुवारी करण्यात आलेल्या स्पष्टीकरणामुळे सरपंच हल्ला प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर बीडमधील शस्त्र वापरावरून व परवानगीवरून व त्यासोबतच पिस्तूल, गन बाळगण्याच्या लायसन्स मिळवण्यावरून एकमेकांवर आरोप होत असतानाच प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ला प्रकरणात पोलीस सूत्रांकडून खळबळजनक माहिती समोर आली असून हल्ल्याचा सगळा बनाव खुद्द सरपंचानेच केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
तुळजापुरातील सरपंच हल्ल्यात मोठी माहिती समोर आली असून सरपंचाने बंदुकीचं लायसन्स मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले आहे. सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळ पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील मेसाई जवळगा या गावचे सरपंच नामदेव निकम हे 26 डिसेंबरला मध्यरात्री त्यांच्या गाडीने जात होते. यावेळी अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला करत दगडांनी काचा फोडून, गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार सरपंच निकम यांनी पोलिसांत दिली होती. दरम्यान पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
सरपंच निकम यांच्यावर रात्रीच्या दरम्यान व्होनाळा ते मेसाई जवळगा रोडवर मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. मेसाई जवळगाचे सरपंच निकम यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमले होते. या प्रकरणात पोलिसांनी पूर्ण तपास करत गुरुवारी या घटनेबाबत मोठा खुलासा केला. यामध्ये नामदेव निकम यांनी बंदुक परवाना मिळवण्यासाठी स्वत:च आपल्या गाडीवर हल्ला करण्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शोले स्टाईल केले होते आंदोलन
या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले होते. सरपंच नामदेव निकम यांची फिर्याद आणि घटनास्थळाच्या पंचनाम्यातील तफावतीमुळे हा बनाव उघड झाला आहे. बंदूक परवाना मिळवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी सरपंच व गावकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू केले होते. पण आता आंदोलन केल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता काय कारवाई होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.