Uday Samant: गुजरातला जाणारे प्रकल्प आम्ही महाराष्ट्रात आणतोय; उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Uday Samant responds to Aaditya Thackeray : गुजरातमधून महाराष्ट्रात प्रकल्प आणत असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला जात असल्याच्या आदित्य ठाकरेंच्या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले.
Uday Samant Gujarat projects Maharashtra
Uday Samant on Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uday Samant responds to Aditya Thackeray : महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी उद्योग विभाग सक्षमपणे काम करत असून, गुजरातमधून महाराष्ट्रात येणारे प्रकल्पही आपण आणत असल्याचा दावा, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह कॉमनवेल्थ स्पर्धा आणि महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या उद्योग-गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सामंत बोलत होते.

दिल्लीत आयोजित केला जाणारा ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा गुजरातमधील केवाडिया येथे होणार आहे. यावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि उद्योग मंत्रालयावर टीका केली.

Uday Samant Gujarat projects Maharashtra
Gulabrao Patil News : शिंदेंचा पक्ष तीन-चार वर्षांचं बाळ, कोण हिणवतय..? मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला समाचार

आदित्य ठाकरे यांनी टीका करताना, “महाराष्ट्रातील रिफायनरी, अणुऊर्जा प्रकल्प, ठाण्यातील डेटा सेंटर यांसारखे प्रदूषणात्मक प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये घेऊन जावे. त्याऐवजी चांगले पुरस्कार, कॉमनवेल्थ स्पर्धेसारखे सोयी-सुविधायुक्त उपक्रम या राज्यात का आणता येत नाहीत? आता फक्त राष्ट्रपती भवन गुजरातमध्ये नेण्याचं राहिलं आहे,” असा टोला लगावला होता.

‘गुजरातमधून येणारे प्रकल्पही महाराष्ट्रात आणतोय’

उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना उद्योग विभागाच्या कामाचा दाखला दिला. “गुजरातमध्ये येणारे प्रकल्पही आम्ही महाराष्ट्रात आणत आहोत,” असे सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी उद्योग विभाग सक्रियपणे काम करत असून, काही महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MOU) झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Uday Samant Gujarat projects Maharashtra
भाजपसोबत असलेल्या नितिश कुमारांच्या पक्षात खळबळ! थेट पक्षाचं नाव बदलण्याच्या हालचाली?

‘त्यांच्या टीकेकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही’

आदित्य ठाकरे यांच्या सातत्याने होणाऱ्या टीकेवरही सामंत यांनी भाष्य केले. “ते आमच्यावर सातत्याने टीका करतात; मात्र आम्ही कामातून उत्तर देतो. त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.

सामंत यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा दाखला देत आदित्य ठाकरेंना सल्लाही दिला. “आमच्यावर टीका करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की ही आमची पाचवी टर्म आहे, तर त्यांची दुसरी. त्यामुळे त्यांनी संयमाने घ्यायला शिकलं पाहिजे,” असे सामंत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com