.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षात सध्या मोठी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. पक्षाच्या नावातच बदल करण्याची मागणी समोर आल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि राज्यासभा खासदार संजय झा यांनी पक्षाचे नाव बदलून जनता दल नीतीश करण्याच्या प्रस्ताव मांडला आहे
‘नितीश संवाद’ कार्यक्रमात संजय झा यांनी ही भूमिका मांडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांना उद्देशून बोलताना त्यांनी JDU ची ओळख ‘जनता दल नितीश’ अशी करण्याची सूचना केली. नितीश कुमार यांनी बिहारच्या विकासासाठी आणि पक्षाच्या प्रगतीसाठी दीर्घकाळ काम केले आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून पक्षाला त्यांचे नाव देण्याचा विचार व्हावा, असा प्रस्ताव संजय झा यांनी मांडला.
या विधानामुळे बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे केंद्रातील मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या चर्चांमुळे JDU मध्ये मंत्रिपदासाठी नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असतानाच पक्षाच्या नावाचा मुद्दा समोर आला आहे.
यापूर्वी बिहारमधील बख्तियारपूर शहराचे नाव बदलून ‘नितीशपूर’ करण्याची मागणी चर्चेत आली होती. बिहार सरकारमधील मंत्री संतोष सुमन यांनीही अशी मागणी केली होती. त्यानंतर आता संजय झा यांच्या विधानामुळे नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
JDU च्या नावात खरंच बदल होणार का, की संजय झा यांनी नितीश कुमार यांच्या राजकीय योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ही सूचना केली आहे, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या नावाबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.