'त्या' समाजकंटकांना त्वरित शोधून काढा : उदयनराजे संतापले

Shivaji Maharaj statue desecrated in Bengaluru : खासदार उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया
Udaynraje Bhosale

Udaynraje Bhosale

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना (Shivaji Maharaj statue desecrated in Bengaluru) झाल्याप्रकरणाचे पडसाद आता संपुर्ण राज्यभरात दिसून येत आहेत. बेळगावमध्येही या घटनेचा निषेध म्हणून मराठी भाषकांनी निदर्शने आणि रास्ता रोको केला, दगडफेकही करण्यात आली. दरम्यान या सगळ्या घटनेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३ वे वंशज आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार उदयनराजे यांनी ट्विटव्दारे कर्नाटक प्रशासनाला इशारा देताना म्हंटले की, संपूर्ण भारताची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना झाली. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. सरकारने त्या समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तत्काळ कठोर कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

त्या विकृतीचा निषेधच! राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आदर्शाच्या सन्मानाआड येणार नाहीत

राज्याचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही, तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच!

<div class="paragraphs"><p>Udaynraje Bhosale</p></div>
त्या विकृतीचा निषेधच! राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आदर्शाच्या सन्मानाआड येणार नाहीत...

ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील काही आरोपींना सुद्धा अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com