Mahayuti Goverment : ठाकरेंच्या दणक्यानंतर महायुती सरकारची माघार; 'हिंदी'बाबत घेतला सर्वात मोठा निर्णय

Political News : नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर येत्या काळात निर्णय घेतला जाईल असे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Mahayuti Goverment
Mahayuti GovermentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ठाकरे बंधूच्या दणक्यानंतर महायुती सरकारने माघार घेतली आहे. हिंदी सक्तीबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला असून या पूर्वीचे दोन्ही जीआर रद्द करीत नव्याने त्रिभाषा सूत्र ठरविण्याबाबत समिती नेमण्यात येणार आहे.नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर येत्या काळात निर्णय घेतला जाईल असे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadanvis) यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी 16 जून 2025 चा जीआर व महायुती सरकारने 25 जून 2025 काढलेला जीआर रद्द करण्यात आला आहे. मराठी सक्तीची केली आहे. तर कुठलीही भारतीय भाषा चालेल म्हटले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Mahayuti Goverment
Raj-uddhav Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मोठी अपडेट; मनसे-उद्धव ठाकरे सेनेच्या ‘या’ दोन बड्या नेत्यांची भेट, बंद दराआड नेमकी काय झाली चर्चा?

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या दृष्टीने मराठीचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. 21 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना एक समिती नेमली होती. 16 ऑक्टोबर 2021 रोजी जीआर निघाला. त्यामध्ये रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली 18 सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने सादर केलेला 101 पानांचा अहवाल 21 सप्टेंबर 2021ला त्यांनी स्वीकारला आहे. या अहवालात एक उपगट तयार केला होता. उबठाचे विजय कदम या गटाचे सदस्य होते. त्यांनी पहिली ते बारावीपर्यंत हिंदी सक्तीची करावी, असे म्हटले होते.

Mahayuti Goverment
Uddhav Sena defection : उद्धव ठाकरेंची बड्या नेत्याने सोडली साथ; मशाल खाली ठेवत माजी शहरप्रमुख उचलणार धनुष्यबाण

हा अहवाल सादर झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरीदेखील आहे. जानेवारी 2022 मध्ये त्याच जीआरवर काम करीत असताना आताच्या सरकारने जीआर काढला आहे. 16 एप्रिल 2025 ला राज्य सरकारने जीआर काढला होता. त्यानंतर आमच्या सरकारने 17 जून 2025 ला जीआर बदलला. त्यानंतर मराठी सक्तीची केली आहे. तर कुठलीही भारतीय भाषा चालेल असे त्यामध्ये म्हटले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Mahayuti Goverment
Raj-Uddhav Thackrey Alliance : उद्धव-राज एकत्र आल्यास ग्रामपंचायत ते विधानसभा ठाकरेंचा झेंडा! मनसे नेत्याचे मोठं विधान

सक्तीची केलेल्या हिंदीला आमच्या महायुती सरकारने ऑप्शन दिला आहे. सर्वच पक्षाने या अहवालाला मान्यता दिली आहे. सत्तेत आल्यानंतर स्वीकारायचे सत्तेत नसले की विरोध करायचे ही दुहेरी भूमिका काही पक्षांची आहे. तुम्हीच मान्यता दिली तर कुठल्या तोंडाने विरोध करता, असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना विचारायला हवा, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Mahayuti Goverment
BJP Vs NCP : निवडणुकीच्या आधीच रणधुमाळी! भाजप-राष्ट्रवादी आमने सामने; मुश्रीफांच्या दाव्याने महायुतीत मिठाचा खडा?

त्यानंतर आता 16 जून 2025 चा जीआर व महायुती सरकारने 25 जून 2025 काढलेले दोन्ही जीआर रद्द करण्यात आला असल्याची घोषणा त्यांनी केली. हे जीआर रद्द करून नव्याने त्रिभाषा सूत्र ठरविण्याबाबत नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Mahayuti Goverment
BJP new state president : पक्षनेतृत्वानं दाखवला मोठा भरवसा; मित्रपक्षाला भिडणाऱ्या भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांना आता गियर बदलावा लागणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com