Uddhav Thackeray attack on Fadnavis : उद्धव ठाकरेंचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल; 'ओला दुष्काळ म्हणा अथवा....'

Uddhav Thackeray attack on Fadnavis News : सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असलेल्या फडणवीस यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात का? मुख्यमंत्री असताना होत नाहीत का? मला वेदना झाल्या होत्या. त्यामुळे मी कर्जमाफी केली होती. त्यामुळे सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असलेल्या फडणवीस यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. 'पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री भेटले, अजून यांचा अभ्यास आणि प्रस्ताव सुरू आहे. केंद्राचे पथक अजूनही राज्यात आले नाही. येणार केव्हा? येणार की नाही? आल्यावर पाहणी होणार कधी? पंचनामे होणार कधी? निर्दयीपणे हा कारभार चालला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा,' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Uddhav Thackeray question to BJP: कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये जाण्याची वाट पाहत आहेत का? उद्धव ठाकरेंचा सवाल

राज्य सरकारकडे आम्ही कर्जमाफीची मागणी केली. त्यांनी अनेकदा शब्दांचा खेळ केला. एखादी संज्ञा नाही, शब्द नाही म्हणून मदत नाकारणार आहात का? ओला दुष्काळ हा शब्द नसेल, पण माणसाच्या पदानुसार शब्द बदलतो का? माझ्याकडे एक पत्र आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने मला पत्र पाठवले होते. तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते, असे स्पष्ट करीत ठाकरे यांनी ते पत्रच पत्रकार परिषदेत वाचून दाखवले.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Raj आणि Uddhav Thackeray एकाच बॅनरवर , राज ठाकरे दसरा मेळाव्याला येणार ?। Mumbai News।

यासाठी ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेते असताना लिहिलेल्या एका पत्राचा दाखला दिला. या पत्रात फडणवीस यांनी राज्य सरकारला तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आता याच पत्राचा दाखला देत ठाकरे यांनी देखील सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी थेट मागणी केली आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने मला पत्र पाठवले होते. तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. 16 ऑक्टोबर 2020 चे पत्र आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Satej Patil : शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर सरकारचा दरोडा, पडळकरांना पक्षातून काढा, सतेज पाटलांनी सगळचं काढलं

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक अतिवृष्टीत वाहून गेले आहे. काही लोकांच्या घरातील संसाराचे सामान वाहून गेले आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासारखी पिके तर पूर्णपणे हातातून गेली आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, हेक्टर 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Government
Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर 'तो' हल्ला झालाच नाही! नागपूर पोलिसांचा कोर्टात 'बी फायनल' रिपोर्ट सादर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com