Uddhav Thackeray News : फेसबुकवरून सरकार चालत नाही म्हणणारे आता इन्स्टाग्रामवरून देश चालवतात; उद्धव ठाकरेंचा PM मोदींना टोला

Uddhav Thackeray statement on NEET student News : एकीकडे विद्यार्थ्यांवर अन्याय व अत्याचार झाले आहेत. विधार्थी त्यांची भेट घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, पीएम मोदी यांना त्यांची भेट घेण्यासाठी वेळ नाही.

Narendra Modi, Uddhav thackeray
Narendra Modi, Uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सीजीपीने नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत देशभरात आंदोलन करून केंद्र सरकारला घेरले आहे. या विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नावर आंदोलन केले. त्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारकडून लाठीमार केला जात आहे. या निमित्ताने जालियानवाला बाग हत्याकांडाची आठवण होईल, असे अत्याचार या विद्यार्थ्यांवर झाले आहेत, मात्र त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना भेटत नाहीत. रात्री मध्यरात्री इंस्टाग्रामवरून युवकासाठी मेसेज करतायत. मात्र कोरोना काळात मी फेसबुकवरून जनतेशी बोलत होतो. त्यावेळी हीच मंडळी फेसबुकवरून सरकार चालत नाही, अशी टीका करीत होते. हेच टीका करणारे आता इंस्टाग्रामवरून सरकार चालवत आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी PM मोदींना लगावला.

मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. एकीकडे विद्यार्थ्यांवर अन्याय व अत्याचार झाले आहेत. विधार्थी त्यांची भेट घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, पीएम मोदी यांना त्यांची भेट घेण्यासाठी वेळ नाही. दुसरीकडे मात्र, बंडखोर खासदार मंडळींना भेट देऊन कोणता संदेश देत आहेत, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे.

देशातील तरुण त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करताना तुम्ही त्यांना भेटत नाही. बंडखोर खासदारांना नुसते भेटत नाहीत, तर मी तुमच्या पाठिशी आहे असे सांगतात. त्यांनी तरुणांना भाऊ, आजोबा फ्रेंड्स म्हणून भिऊ नका मी तुमच्या पाठिशी उभा आहे हे सांगायला पाहिजे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


Narendra Modi, Uddhav thackeray
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक! ऑपरेशन टायगरनंतरही भाजपची कोंडी; केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती यशस्वी?

‘देशात गद्दारीचा व्हायरस पसरत आहे. मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांनी लोकशाहीसाठी लढले पाहिजे. देशातील तरुणाचं माथं भडकले आहे. आता त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी तरुण ऐकायला तयार नाही. मोदींचे आवाहन गंभीर असून आम्ही कोर्टाच्या लक्षात आणून देणार आहोत. पण मोदींनी कुणाला धमकी दिली. गद्दारांना कुणाची भीती आहे, हे समोर आले पाहिजे. माझ्या मनातील शंका कळावी म्हणून वाचा फोडत आहे, असे ठाकरेंनी पुढे सांगितले.


Narendra Modi, Uddhav thackeray
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक! ऑपरेशन टायगरनंतरही भाजपची कोंडी; केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती यशस्वी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com