Uddhav Thakeray
Uddhav Thakeray Sarkarnama

Balasaheb Thackeray Tradition : बाळासाहेबांच्या काळातील परंपरा यंदाही कायम; उद्धव ठाकरेंनी मातोश्रीच्या दारावर बांधलं 'खास' तोरण

Matoshree traditions : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुरु झाली झालेली ही परंपरा आजही शिवसैनिकांनी ती जोपासली आहे.
Published on

अलिबाग तालुक्यातील चौल या गावी दरवर्षी नवान्न पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त एक खास परंपरा साजरी केली जाते. नवान्न पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर तोरण बांधले जाते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुरु झाली झालेली ही परंपरा आजही शिवसैनिकांनी ती जोपासली आहे. दरवर्षी नवान्न पौर्णिमेच्या दिवशी मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण बांधले जाते.

नवान्न पौर्णिमा ही कृषिप्रधान देशातील शेतकरी आणि बळीराजाचे निसर्गाशी असलेले अतूट नाते दाखवणारी अनोखी परंपरा आहे. नवीन पीक हातात येण्याच्या आनंदात लोक घरोघरी भाताच्या लोंब्यांचे तोरण लावतात. याच परंपरेतून अलिबाग तालुक्यातील चौलमधील युवक देखील सहभागी होतात.

या वर्षीही शिवसैनिकांनी मातोश्रीवर भाताच्या लोंब्यांचे सुंदर तोरण पाठवले जाते. गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. या तोरणाची तयारी अलिबाग तालुक्यातील निसर्गप्रेमी युवक राकेश काठे करत असतात. ते मागील दहा वर्षांपासून या परंपरेची जबाबदारी घेत आहे. या वर्षीही उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने तोरण बांधण्यात आले.

Uddhav Thakeray
IPS Death Case Details : IPS अधिकाऱ्यावर का आली आत्महत्येची वेळ? ही आहेत धक्कादायक कारणे...

दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक, विशेषतः जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उद्धव ठाकरे यांच्यासह मातोश्रीवर तोरण पोहोचवतात. भाताच्या लोंब्यांचे तोरण फक्त सजावटीसाठी नसून, शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि नव्या पिकाची समृद्धीची प्रतीक आहे. स्थानिक लोक या उत्सवात खूप उत्साही असतात. घराघरात धान्याचे भारे बांधले जातात, रांगोळ्या आणि दिव्यांची सजावट केली जाते, आणि धान्यलक्ष्मीचे स्वागत उत्साहाने केले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com