Uddhav Thackeray : 'हे' सरकार घालवावचं लागेल... पवार सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरु असतानाच ठाकरेंची प्रतिज्ञा

Uddhav thackeray on BJP and mahayuti government : खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन सोहळा झाला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफाणी भाषण केलं. तसेच आपल्या खास शैलीत सत्ताधारी महायुतीवर जोरदार निशाना साधला. त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या भाषणाचा धागा पकड हे सरकार उद्या जाणार, ते आपल्याला घालवावं लागणार असल्याचे म्हटलं आहे. हा सोहळ्या येथील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात झाला. यावेळी ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले उपस्थित होते.

आपला देश स्वर्गासारखा

उद्धव ठाकरे यांनी, आपल्यासाठी सध्या एक कसोटीचा क्षण असून असे दिवस येतात आणि जातात. सरकारं येतात आणि तेही जातात हे सरकार देखील उद्या जाईल. ते आपल्याला घालवावंच लागेल, असे आवाहन उपस्थितीतांना केलं आहे. तसेच त्यांनी आपल्याला हे किंवा ते व्हायचंय म्हणून असं करायचं नाही. तर हा आपला देश स्वर्गासारखा आहे. पण याचा नरक करण्याचं काम या सरकारनं केलं आहे. आजही यांचा प्रयत्न हा देशात नरकात टाकण्यासाठीच सुरू आहे. पण आपल्याला यांचा हा डाव हाणून पाडायचा असून याच सरकारला नरकात टाकण्यासाठी लढावं लागेल. फक्त लढावचं नाही तर लढाईही जिंकावी लागेल, अशी साद उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातली आहे.

सर्व कुटुंबाने धाडस दाखवलं

या प्रकाशन सोहळ्याला राऊत यांच्या आई, वहिनी, दोन्ही मुली, जावई आणि दोन्ही भाऊ उपस्थित आहेत. जर घरचं ढेपाळलं तर, लढवय्या माणूस लढूच शकत नाही. पण जेव्हा राऊत यांच्यावर संकट कोसळलं तेव्हा त्यांच्या आई आणि सर्व कुटुंबाने धाडस दाखवलं. या धाडसाला सीमाच नाही. राऊत यांना अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी ठाकरे त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी राऊत यांच्या आई आम्हालाच धीर देत होत्या.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : तब्बल 35 वर्षे जळगावचं राजकारण कोळून पिलेल्या नेत्यानं सोडलेली साथ ; उद्धव ठाकरेंना यंदा पालिकेचा गड सोपा नसणार

संधीसाधू पळून गेले

आयुष्याच्या प्रवासात अनेक माणसे भेटतात काही सोबत राहताततर काही संधीसाधू संधी मिळताच पळ काढतात. पण आज आपल्या सगळ्यांची परीक्षा स्वत: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेत आहेत. आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं, त्यांच्याकडून कोणी काय घेतलं, हे ते बघत आहेत. त्यांचं एक वाक्य आहे, शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. हेच वाक्य संजय राऊत जगले आहेत.

राऊतांचे कौतुक

याच्याआधी अनेक लढय्या आपण लढतो पुढेही लढायाच्या आहेत. यामुळे संजयचं पुस्तक वाचून लोकांच्या मनातील तुरुंगाची भीती निघून जाईल. संजय तू या पुस्तकाने लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलंसं असेही उद्धव ठाकरे म्हणाले

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीय माजी नगरसेविकेचा राजीनामा; स्थानिक नेतृत्वावर नाराजी

निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या

यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर देखील बोट ठेवताना टीका केलीय. त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन. यासाठी सरकारने बोलावलं होतं. त्यावेळी अनिल परब आणि अनिल देसाई यांना पाठवलं होतं. वन नेशन, वन इलेक्शन, फार गोंडस असूनही त्यात पारदर्शकता कुठे आहे, असा सवाल त्यांनी केलाय. तसेच नुकताच सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे भूषण गवई यांच्या मातोश्रीने देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची विनंती केलीय. यामुळे आता संशय कमी करायचा असेल तर देशात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, नंतर टिमकी वाजवा, असे आवाहान केंद्र सरकारला उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com