Uddhav Thackeray On Mohan Bhagwat : मणिपूरच्या झळा एका वर्षाने संघाच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या, ठाकरेंनी भागवतांना डिवचलं

Uddhav Thackeray Criticize BJP And RSS On Manipur Violence : "नरेंद्र मोदींना देश सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याचा अधिकार नाही. मणिपूरबाबत वर्षभराने का होईना मोहन भागवत बोलले ते देखील काही कमी नाही."
Uddhav Thackeray, Mohan Bhagwat
Uddhav Thackeray, Mohan BhagwatSarkarnama

Uddhav Thackeray On RSS : लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून ठाकरे गटाने भाजपवर हल्लाबोल सुरु केला आहे. शिवाय नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतरही हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचं भाकीत शिवसेना ठाकरे गटाकडून केलं जात आहे.

अशातच आता भाजपवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाने थेट भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना टार्गेट केलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोहन भागवत यांनी मणिपूरबाबत सरकारला दिलेल्या सल्ल्यावरून टोला लगावला आहे.

"देशात सतत दहशतवादी हल्ले होत आहेत, मणिपूर जळतं आहे आणि हे सत्ताधारी तिकडे फिरकत नाहीत. मणिूपरच्या विषयावर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाष्य केलं. मणिपूर जळतंय हे एक वर्षाने का होईना त्यांनाही दिसलं", असं म्हणत ठाकरेंनी भागवतांना डिवचलं. तर भागवतांनी सांगितल्यानंतर तरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा मणिपूरला जाणार का? असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, "नरेंद्र मोदींना देश सांभाळता येत नसेल तर त्यांना पंतप्रधानपदावर बसण्याचा अधिकार नाही. मणिपूरबाबत वर्षभराने का होईना मोहन भागवत बोलले ते देखील काही कमी नाही. मणिपूरच्या झळा अखेर त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या. त्यांची संदेशवाहक यंत्रणा इतकी कुचकामी असेल, असे संदेश पोहोचायला एक वर्ष लागत असेल तर ती आता सुधारावी लागेल, असा टोला त्यांनी यावेळी संघाला लगावला.

Uddhav Thackeray, Mohan Bhagwat
Narendra Modi Vs Priyanka Gandhi : मोदींविरोधात प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात असत्या तर..!

तसंच भागवत जे काही बोलले ते पंतप्रधान मोदी गांभीर्याने घेणार का? निवडणूक प्रचाराच्या शेवटी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते, आम्हाला आता 'आरएसएस'ची गरज नाही. आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत. खरंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपचा पाया मानलं जातं. मात्र आता भाजप वाल्यांना संघाचीही गरज वाटत नाही. भागवतांसारख्या ज्येष्ठ नेत्याने मणिपूरची व्यथा मांडल्यानंतर तरी पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूरला जाणार का नाही? असा प्रश्न पडला असल्याचंही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray, Mohan Bhagwat
Sharad Pawar On Narendra Modi : सत्ता डोक्यात घुसली की मोदींची गॅरंटी चालत नाही,पवारांची मोदींवर टीका !

...तर मोदी सरकारला हटवा

दरम्यान, संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या मणिपूरबाबतच्या विधानावरुन भाजप आणि 'आरएसएस'ला लक्ष केलं होतं. निवडणूक प्रचार संपला आहे. कटुता संपवा आणि मणिपूरकडे लक्ष द्या, असं वक्तव्य भागवत यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "मोहन भागवत यांना काही वाटत असेल तर त्यांनी या सरकारला हटवावं. त्यांच्या आशीर्वादचेने सरकार सुरू आहे. जे अहंकार बाळगत आहेत त्यांना सत्तेवरून बाजूला काढून पहा. तुम्ही आशीर्वाद सरकारला का देताय? मोहन भागवत यांनी संघ आणि भाजपचा काही संबंध नाही, असे स्पष्टपणे सांगावे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com