Sharad Pawar On Narendra Modi : सत्ता डोक्यात घुसली की मोदींची गॅरंटी चालत नाही,पवारांची मोदींवर टीका !

Lok Sabha Election 2024 : दहा वर्ष लोकांनी पाहिलं, मात्र तुमची गॅरंटी जर लोकांच्या हिताची नसेल तर ही गॅरंटी मान्य होणार नाही हे लोकांनी दाखवून दिलं.
Narendra Modi - Sharad Pawar
Narendra Modi - Sharad PawarSarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीची मोठी सरशी झाली आहे. आघाडीतील तिन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झाला असून 31 जागा निवडून आल्या आहे. काँग्रेस शरद पवार पक्षाचा स्ट्राइक रेट हा 80 चा राहिला आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा कामाला लागले असून आज ते पुरंदर मधील दुष्काळ दौऱ्यावरती आहेत. दरम्यान त्यांनी लोकसभा निकलाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरती टीका केली.

शरद पवार म्हणाले, सध्या पुरंदर, इंदापूर आणि बारामती या भागामध्ये दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे या भागाचा दौरा करू दुष्काळाबाबत सरकारला जागा करण्याचं काम आम्ही करत आहोत. पुरंदर भागातील चारा पाण्याचा जो प्रश्न आहे. तो तातडीने मार्गी लावण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी हा दुष्काळ दौरा आयोजित केला आहे.

Narendra Modi - Sharad Pawar
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मिशन विधानसभा; साताऱ्यातील 'या' जागांवर उमेदवार देणार?

समाजातील सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची विचारधारा आपण पुढे नेली आहे. मात्र नेमकी या विचारधारेच्या उलट सध्याचे सत्ताधारी करत आहेत. दहा वर्षात ते मोठे बहुमत घेऊन सत्तेत होते. मात्र आत्ता त्यांना बहुमत मिळाले नाही. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची त्यांना मदत घ्यावी लागत आहे. त्यांची मदत नसती तर भाजपचं (BJP) सरकार केंद्रात आलंच नसतं. सत्ता डोक्यात गेली पाय जमिनीवरती राहिले नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो.आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला.

ते मोदी की गॅरंटी असं ते म्हणत होते. मात्र ती गॅरंटी आता चालत नाही. 10 वर्ष लोकांनी पाहिलं मात्र तुमची गॅरंटी जर लोकांच्या हिताची नसेल तर ही गॅरंटी मान्य होणार नाही हे लोकांनी दाखवून दिलं. आणि भाजपाला देशामध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही अशी सध्या देशामध्ये स्थिती आहे. त्यामुळे देशातील आणि राज्यातील विरोधी पक्षातील नेते एकत्र करून राज्यातील आणि देशातील लोकांच्या हिताची जपणूक करण्याचं काम आम्ही करणार आहोत. देशाला आणि राज्याला सक्षम असा विरोधी पक्ष हवा आहे. आणि तो निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.

Narendra Modi - Sharad Pawar
Sharad Pawar : लोकसभा निकालानंतर बारामती व्यापारी संघटनेचा नूर बदलला...

राज्यातील आणि केंद्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ठरवलं आहे की एकत्र राहून राज्यातील आणि देशातील लोकांचं दुःख कसं कमी करता येईल यासाठी प्रयत्न करायचा. विरोधी पक्ष म्हणून ची संधी दिली आहे. त्याचा पुरेपूर वापर करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं शरद पवार म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com