Uddhav Thackeray Delhi Tour : उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते आज इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांनी डिनरसाठी राहुल गांधींनी देखील निमंत्रण दिले आहे. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष हा इंडिया आघाडीत आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे युती करण्याची चर्चा आहे. दरम्यान, राज यांच्यासोबत युती करण्यासाठी उद्धव यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडावे लागेल, अशी चर्चा आहे.
इंडिया आघाडीच्या बैठीकत राज यांच्याबाबत चर्चा होणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पत्रकारांना विचारले असता त्यांनी अवघ्या एका वाक्यात हा विषय संपवला. ते म्हणाले, 'मला वाटतंय या मुद्यावर दुसऱ्यांनी चर्चा करायची गरज नाही. आमची भूमिका ठरवायला आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत. इंडिया आघाडीसाठी कोणत्याही अटी शर्ती नाहीत. याविषयी उद्धव यांना अधिक विचारले असता यावर मुंबईत बोलू असे म्हणत त्यांनी यावर आणखी भाष्य करणे टाळले.
मोदी सरकारवर देखील ठाकरेंनी जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, सरकारला तशी नितीमत्ता राहिलेली नाहीये. पाकिस्तान हा दुश्मन आहे हे शिवसेनाप्रमुख सांगायचे. आम्ही दिल्लीत, मुंबईत भारत-पाकिस्तान मॅच रोखली होती. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवता कामा नये, असे सांगितले होते. सुषमा स्वराज देखील या विषयी बोलल्या होत्या. मात्र आता हे फक्त मतलबाचे बघतात देशप्रेमाचे धडे देतात. जय शाह आणि इतर मंत्र्यांची मुलं पाकिस्तानसोबतचा समाना इन्जाॅय करतात, असा टोला ठाकरेंनी लगावला.
एनडीएने मराठी चेहरा उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी दिला तर त्याला पाठींबा देणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता ते म्हणाले. देतील तेव्हा बोलू. पण उपराष्ट्रपतींना तडकाफडकी काढलं का आणि आता ते आहेत कुठे? यामुद्यावर चर्चा झाली पाहिजे. ईव्हीएमध्ये दिलेले मत जाते कुठे असा प्रश्न नागरिकांना पडतोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.