Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज व उद्धव ठाकरे एकत्र आले होते. ठाकरे बंधूनी एकत्र येत महापालिका निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत मनसे व उद्धव ठाकरे यांच्या युतीचा पराभव झाला होता. त्यामुळे ठाकरे बंधूंचे मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्याचे स्वप्न भंगले होते. त्यातच कल्याण डोंबविली महापालिका निवडणुकीत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठींबा दिला होता तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रपूरमध्ये भाजपला पाठींबा दिला. त्यामुळे दोघांनाही एकमेकांवर टीका केली होती.
त्यातच बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे दोन्ही गटातून उलटसुलट प्रतिक्रिया ऐकावयास मिळत असतानाच आता दुसरीकडे या भेटीगाठीच्या पार्श्वभूमीवर या भेटीनंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पद येत आहेत. त्यापैकी एक नगरसेवकपद उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसेला द्यावे, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्यांच्या पक्षातील तीन स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. त्यामुळे हा राज ठाकरे यांच्या मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे इच्छुकांची मोठी यादी होती. त्यामध्ये आता साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर, कैलास पाठक या तीन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याआधी मनसेकडून (MNS) यशवंत किल्लेदार यांनी उद्धव सेनेच्या तीन स्वीकृत नगरसेवकांच्या कोट्यातून मनसेला एक स्वीकृत नगरसेवक मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याकडे दुलुक्ष केल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तीन स्वीकृत नगरसेवक पद मिळणार असल्याने एक पद मनसेला सोडावे, अशी मागणी केली होती. मात्र, उद्धव ठकरे यांनी त्यांच्या पक्षातील तीन जणांना या पदावर संधी दिली आहे. त्यामुळे आता मनसेच्या अपेक्षांवर पाणी सोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची निवड 28 फेब्रुवारीला होणार आहे. या स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा त्यादिवशी केली जाणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच ही घडमोड घडल्याने मनसे आणि ठाकरे गटात मिठाचा खडा पडला आहे का? अशा स्वरूपाच्या चर्चेला उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.